आशाताई बच्छाव
वळग सोसायटी चेअरमन पदी नरसिंगराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी लक्ष्मण अंकलवार यांची एकमताने निवड.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील वळग सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी नरसिंग राव उर्फ तुकाराम पंढरीनाथ राव पाटील व व्हाईस चेअरमन पदी लक्ष्मण ईरप्पा अंकलवार यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून वळग सेवा सहकारी सोसायटी सचिव शैलेश पाटील यांनी काम पाहिले. सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत. निवडणूक निर्वाचन अधिकार्यांकडे चेअरमन पदासाठी व्हाईस चेअरमन पदासाठी एक एकच अर्ज आल्यामुळे चेअरमन व व्हाईस चेअरमन ची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. तसे निवडीचे पत्र निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याने सर्वांच्या उपस्थितीत दिले.
यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते व तसेच उपसरपंच माधव मोरे, सरपंच प्रतिनिधी नागनाथ गज्जलवार, तुकाराम पाटील, दादाराव मोरे, व्यंकट मोरे गुरुजी, वामनराव बुक्कावार, रावसाहेब मोरे, तेजराव कावटवाड, लक्ष्मण कावटवाड,शिवाजी पाटील, बाळू पाटील, चंद्रकांत मोरे, व्यंकटराव पोलीस पाटील, विठ्ठल राव पाटील, नागनाथ पवार, पत्रकार चंद्रकांत गज्जलवार ,शंकर बुके वाड, पोच्चना आचेमवार, यादव बुके वाड, गंगाबाई बुक्की वाड,आदि उपस्थित होते. सर्वांनी या निवडीबद्दल समाधान व्यक्त करून चेअरमन व व्हाईस चेअरमन चे अभिनंदन केले. सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.