Home नांदेड भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220628-WA0066.jpg

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

(देगलूर) : येथील परम पूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज ७१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला .तसेच, शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे व बि.टी.एस. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व भावी शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी स्थानिक समन्वय समितीचे सन्माननीय अध्यक्ष मा. चंद्रकांत सेठ रेखावार, उपाध्यक्ष प्रा. गिरीशजी वझलवार, कार्यवाह प्रकाशभाऊ चिंतावार, सहकार्यवाह गिरीशभाऊ गोले, कोषाध्यक्ष भरतदादा अटकळीकर, प्राथमिक विभागाच्या शालेय समितीच्या अध्यक्षा सौ.अटकळीकर व सदस्या अनुराधाताई गोले , स्थानिक सदस्य संग्राम पाटील नागराळकर, संतोषराव महाजन, प्राथमिक मुख्याध्यापक दमन देगावकर उपस्थित होते.
संस्था ध्वजारोहण स्थानिक अध्यक्ष मा.चंद्रकांत सेठ रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिमा पूजना नंतर उपस्थित सर्व सन्माननियांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात गिरीश दीक्षित यांच्या पद्याने झाली.
७१ वर्षे दीर्घ काळापासून चालत असणारी संस्था म्हणजे भा.शि. प्र संस्था होय असा उल्लेख प्रस्तावनेत स्थानिक उपाध्यक्ष प्रा. गिरीशजी वझलवार यांनी केला.
यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची माहिती वसंत वाघमारे यांनी दिली. विशेष प्राविण्यात ४१ विद्यार्थी तर ९०% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या ७ विद्यार्थ्यांचे उपस्थित सन्माननियांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.
तसेच, प्राथमिक विभागातील बि.टी.एस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. चि.वैभव यादव इबितदार या विद्यार्थ्यांस गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मा.गिरीशभाऊ गोले यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच, अन्य विद्यार्थ्यांचेही या प्रसंगी कौतुक करण्यात आले.
यानंतर संस्थेचा इतिहास प्राथमिक शाळेचे शिक्षक सचिन जाधव यांनी सांगितला. तर कार्यक्रमाचा समारोप मा. गिरीशभाऊ गोले यांनी केला.
ऋणनिर्देश माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले यांनी मानले.या प्रसंगी पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleघुंगराळा येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन.
Next articleबिल्लाळी सेवा सोसायटी चेअरमन पदाची निवड जाहीर ! •] चेअरमन पदी पॅनल प्रमुख अच्युतराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी विठ्ठलराव इंगळेची वर्णी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here