Home नाशिक हाताणे,लेंडाणे आणि आता गाजतंय व-हाणे! कामचुकार अधिकाऱ्यांचा अजब गजब प्रकार..!!

हाताणे,लेंडाणे आणि आता गाजतंय व-हाणे! कामचुकार अधिकाऱ्यांचा अजब गजब प्रकार..!!

57
0

राजेंद्र पाटील राऊत

FB_IMG_1655634500188.jpg

हाताणे,लेंडाणे आणि आता गाजतंय व-हाणे!
कामचुकार अधिकाऱ्यांचा अजब गजब प्रकार..!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-सरकारी काम अन सहा महिने थांब! ही म्हण सर्वत्र प्रचलीत असली,तरी नाशिकच्या मालेगांव पंचायत समितीमधील कामचुकार अधिकाऱ्यांचा अजब गजब प्रकार म्हणजे शासकीय नियमांची क्रुर थट्टाच म्हटली पाहिजे!
मालेगांव पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या व-हाणे या गांवी युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनलने महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश परिपत्रकानुसार पत्रकार भवन बांधकामासाठी ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागा रितसर ग्रामपंचायतीकडे लेखी कागदपत्रांसह मागणी केली आणि त्याच जागेवर युवा मराठा न्युज परिवाराने जनहितार्थ सार्वजनिक पाणपोई तत्कालीन सरपंच श्रीमती संगिता रमेश पवार व ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा कडू सांळुखे यांचे हस्ते उदघाटन करुन सुरु केली,तेव्हापासून सदरची जागा युवा मराठा न्युज परिवाराच्या ताब्यात आहे.मात्र सदरची जागा विधायक व चांगल्या समाजपयोगी कार्यासाठी आजपर्यंत मिळू न देण्याचे काम ग्रामसेविका सांळुखे यांनी केले.
“एका बाजूला कायद्याची भाषा;दुसरीकडे जागा देण्याचा प्रताप”!
श्रीमती सांळुखे यांनी युवा मराठा न्युजने कायदेशीर मागणी केलेल्या जागा मागणीला मुद्दामच प्रलंबीत ठेवत या प्रकरणाला वेगळे वळण देऊन शासनाच्या अध्यादेश परिपत्रकाला देखील महत्त्व न देता ,दुसरीकडे मात्र व-हाणे गावातीलच एका संस्थेच्या वाचनालयाला बिनबोभाटपणे सगळे नियम धाब्यावर बसवून गावातील गावठाण जागा बहाल केली म्हणजे श्रीमती सांळुखे या गावाच्या मालक झाल्यासारख्या वागून मर्जीतल्या लोकांना खिरापतीसारखे गावठाण जागेवर अतिक्रमण वाढविण्यास प्रोत्साहन देत आहेत असे म्हटले तर वावगे काहीच ठरु नये!
“चौकशी अहवालात दोषी असलेल्या ग्रामसेविका सांळुखेवर कार्यवाही का नाही”
युवा मराठा न्युज चँनल परिवाराने केलेल्या मागणीनुसार व-हाणे ग्रामसेविका श्रीमती सांळुखे यांच्या कारभाराची चौकशी पंचायत समितीचे विस्तारअधिकारी गुलाब राजबन्शी यांनी करुन चौकशी अहवालात स्पष्टपणे ग्रामसेविका सांळुखे यांनी कर्तव्यात कसूर करुन जिल्हा परिषद सेवा शर्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवलेला असतानाही अद्याप सांळुखे यांचेवर निलंबनाची कार्यवाही का नाही!गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे नेमके कोणत्या मुहुर्ताची वाट बघत आहेत,आणि त्यामागचे खरे गौडबंगाल काय?
“माहिती अधिकाराची ऐसी तैसी;ग्रामसेविका सांळुखेची मनमानी कशी”
युवा मराठा न्युज परिवाराच्या वतीने माहिती अधिकारातून मागविलेली माहिती देखील ग्रामसेविका सांळुखे यांनी उपलब्ध करुन देण्याचे सौजन्य दाखविले नाही.त्याशिवाय अपील सुनावणीत गैरहजर राहून त्यानंतरही माहिती दिलेली नाही,म्हणून आता हे प्रकरण राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठात अपील म्हणून दाखल होत आहे. “न्यायासाठी न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करणार” चौकशी अहवालात स्पष्टपणे दोषी ठरविल्यानंतरही कार्यवाही करण्यास कुचराई करुन निष्काळजीपणा दाखविणा-या गटविकास अधिकारी जितेंद्र देवरेसह सबंधिताविरुध्द कलम १६६,१७५,१७६,१८८,२१७अन्वये न्यायालयात जनहितार्थ याचिका युवा मराठा न्युज परिवाराच्या वतीने दाखल केली जाणार आहे. “ग्रामसेविका निलंबनासाठी लोकआयुक्तांकडे दाद मागण्यासोबतच आमरण उपोषण” तसे बघितले तर,ग्रामसेविका सांळुखे यांची मालेगांव तालुक्यातील कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरलेली आहे.हाताणे,लेंडाणे व आता व-हाणे प्रत्येक गावातून श्रीमती सांळुखे यांच्या कार्यप्रणालीवर पंचायत समितीकडे रेकाँर्ड ब्रेक तक्रारी असतानासुध्दा गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे कोणत्या उद्देशाने ग्रामसेविका सांळुखे यांना पाठीशी घालून अभय देत आहेत.देवरे साहेबांवर कुठला राजकीय दबाव तर नाही ना?अशी शंका यानिमिताने उपस्थित होत आहे.ग्रामसेविका सांळुखे निलंबनासाठी आता महाराष्ट्राचे लोकआयुक्त यांचेकडे दाद मागण्याबरोबरच मालेगांव पंचायत समिती कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यत आमरण उपोषण छेडण्याचा निर्धारही राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या बैठकीतून मांडण्यात आला आहे.

Previous articleद्रौपदी मुर्मू
Next articleराजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here