Home युवा मराठा विशेष व-हाणे ग्रामपंचायतीचे प्रकरण आता होणार दाखल राज्य माहिती आयुक्ताच्या दरबारात !

व-हाणे ग्रामपंचायतीचे प्रकरण आता होणार दाखल राज्य माहिती आयुक्ताच्या दरबारात !

59
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220621-071701_Google.jpg

व-हाणे ग्रामपंचायतीचे प्रकरण आता होणार दाखल राज्य माहिती आयुक्ताच्या दरबारात !
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या व-हाणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा कडू सांळुखे यांना माहिती अधिकारात माहिती मागितल्यावरही माहिती नाकारल्याने आणि अपील सुनावणीस गैरहजर राहिल्याने आता हे प्रकरण राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठात लवकरच दाखल केले जाणार आहे.
काय आहे हे नेमके प्रकरण-व-हाणे ता.मालेगांव येथील ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांनी सन २०१८-१९ मध्ये व-हाणे गावी युवा मराठाच्या सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन दस्तुरखुद्द ग्रामसेविका सांळुखे व तत्कालीन सरपंच श्रीमती संगिता रमेश पवार यांच्या हस्ते करुन,सदरची शासकीय जागा विधायक कार्यासाठी युवा मराठा न्युजने रितसर ग्रा.पं कडे मागणी करुनही ग्रामसेविका सांळुखे यांनी मुद्दामच हे प्रकरण रेंगाळत ठेवले.व दुसरीकडे मात्र शासकीय जागा नियम धाब्यावर बसवून इतरांना बहाल केल्यात.त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी मागणी केल्यावर त्यात ग्रामसेविका सांळुखे या दोषी आढळल्याचा चौकशी अहवालात स्पष्ट उल्लेख चौकशी अधिकारी गुलाब राजबंशी यांनी ठेवलेला असतानाही अद्यापपर्यत सदर ग्रामसेविकाविरुध्द कुठलीही कार्यवाही झालेली नाही.आणि चौकशी अहवालानुसार गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी देखील त्याची अंमलबजावणी केलेली नाही,म्हणून आता हे प्रकरण देखील जनहितार्थ न्यायालयात व महाराष्ट्राचे लोकआयुक्त यांचेकडे जनहित याचिका म्हणून दाखल केले जाणार आहे.तसेच ग्रामसेविका सांळुखे यांना माहिती अधिकारात विचारलेली माहिती त्यांनी न दिल्यामुळे शिवाय अपीलसाठी सुध्दा गैरहजर राहिल्याने अपील अधिकारी तथा विस्तार अधिकारी सुनील बच्छाव यांनी सात दिवसात माहिती देण्याचे आदेश दिल्यावरही माहिती प्राप्त न झाल्यामुळे आता हे प्रकरण राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठात अंतीम अपील स्वरुपात लवकरच दाखल केले जाणार आहे.

Previous articleबावनबीर येथे घरावर कोसळली कडकडाट वीज,घराचे नुकसान,जीवितहानी टळली
Next article मोठ्ठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची तब्येत खालावली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here