Home राजकीय  मोठ्ठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची तब्येत खालावली

 मोठ्ठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची तब्येत खालावली

181

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0014.jpg

मोठ्ठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची तब्येत खालावली                                                        (स्वप्नील देशमुख बुलढाणा ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. सध्या नाराज एकनाथ शिंदे आमदारांच्या एका मोठ्या गटासह सुरतमध्ये आहेत. पण, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार नितीन देशमुख यांच्याबाबत एक मोठी अपडेट येत आहे. त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदेसोबत सुरतमध्ये असलेल्या आमदारांच्या यादीत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचेही नाव आहे. नव्या माहितीनुसार, नितीन देशमुख यांना पहाटे गंभीरावस्थेत सूरतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या वॉर्डबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Previous articleव-हाणे ग्रामपंचायतीचे प्रकरण आता होणार दाखल राज्य माहिती आयुक्ताच्या दरबारात !
Next articleआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा उत्साहात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.