Home नांदेड अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतातुर, ▪️मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशा...

अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतातुर, ▪️मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशा कडे

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220619-WA0012.jpg

अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतातुर,

▪️मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशा कडे
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मागील दोन वर्ष मोठा त्रास झाला यावर्षी निदान नीट पाऊस पडेल या आशेवर आम्ही आहोत पण अजून पेरणी झाली नाही मग लावणी कधी होईल बी- बियाणे आणून ठेवली आहे देवा आता पाऊस लवकर पडू दे अशी प्रार्थना शेतकरी करीत आहोत”- तुकाराम सुसकीरे (शेतकरी)

मुखेड तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
दिवसेंदिवस वाढते तापमान व सायंकाळी भरून येणारे काळेकुट्ट ढग पण पाऊस मात्र पडायला तयार नाही. अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरण्यांची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्याला चिंता सतावत आहे.जूनच्या पहिल्याआठवड्यात
नेहमीच पावसाचे आगमन होत असते. शेतकरी पावसाळ्यापूर्वीच मशागतीची कामे आटोपून लागणार्या बी-वियाण्यांची
तजवीज या काळात करून ठेवत असतो. पण ता.19 जून उजाडला तरी पावसाचा अजून पत्ता नाही. त्यामुळे या वर्षाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीला उशीर
झाल्यास लावणीला देखील उशीर होणार
याचा विपरीत परिणाम पिकांवर होऊ शकतो याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
मुखेड तालुक्यातील तालुक्यातील जाहूर परिसरात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस आणखीनच लांबला तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसप्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाचे आगमन कधी होणार याकडे मात्र
शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
“अर्थव्यवस्थेला गती”
दमदार पावसाच्या जोरावरच खरीप हंगामा तील पिकेही जोमदार येतात. उत्पादनही चांगले होते.
पर्यायाने जनावरानां चारा आणि अन्न धान्यांची मुबलक उपलब्धता होते. शेतकरी चांगले उत्पादन निघाल्यास अतिरिक्त उत्पादन विक्रीला काढतो. त्यामुळे बाजारात खरेदी-विक्रीची साखळी तयार होते. त्याला दूग्ध उत्पादनाचीजोड मिळते
अलीकडे झपाट्याने वाढलेल्या फळबागा
तही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात.
शेतीचे उत्पन्न चांगले मिळाले तरच शेतकरी ट्रॅक्टर, शेती अवजारे, बी-बियाणे, खते
फवारणीचे पंप, पाणी उपसा करण्याचे पंप आदींची खरेदीकरतो. त्याद्वारे शेतीची प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. यासगळ्या मुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते. पिके चांगली आल्यास शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. मात्र पावसाअभावी शेतकऱ्याचे नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Previous articleव-हाणे प्रकरणात गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे प्रत्यक्ष कृती कधी करणार?जनतेत उत्सुकता..
Next articleसोलापुरात मोठी कारवाई 8 लाखाची गोवा बनावटीची देशी दारू जप्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here