Home सामाजिक बलात्कार ही विकृती..! आपल्या लेकी सुरक्षित तर आहेत ना..?

बलात्कार ही विकृती..! आपल्या लेकी सुरक्षित तर आहेत ना..?

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220615-WA0063.jpg

बलात्कार ही विकृती..! आपल्या लेकी सुरक्षित तर आहेत ना..?

मुंबई (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब चॅनल अँड पोर्टल)

आज कालच्या धावपळीच्या जीवनात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे लागले आहेत यूपीएससीचा आजचा रिझल्ट पाहिला तर 60 ते 70 टक्के महिला मुलीच प्रथम क्रमांकावर आणि अधिक रँक मिळण्याच्या बाबतीत पुढे असलेल्या दिसून येतात तसं पाहायला गेलं तर मुली किंवा स्त्रिया किंवा आजची स्त्री ही चूल आणि मूल न सांभाळता सर्वच क्षेत्रात पुढे गेलेली दिसून येते याचा सार्थ अभिमान अख्ख्या महाराष्ट्राला आहे कालची चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री ही आजची आधुनिक सावित्री आहे. जी प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कमावते आहे आणि पुरुषांना देखील मागे टाकेल आणि लाजवेल अशी कामगिरी प्रत्येक स्री करीत आहे.

परंतु अशा परिस्थितीत या एकविसाव्या शतकात स्त्रियांना खरच मान सन्मान देण्याचा आपण प्रयत्न करतो परंतु तो मिळतो का असा प्रश्न काही काळात उपलब्ध झाले निर्माण झालेला आहे याचे कारण या महत्त्वाच्या आम्ही आपल्या वाचकांना आपण करणार आहोत. आजच्या या आधुनिक युगामध्ये स्त्री कितीही पुढे गेले तरी काही अशा गोष्टी आहेत ज्या समाज आणि आपले राजकीय वरतून तोडून त्या बाहेर जाऊ शकले नाहीये सतीची प्रथा बालविवाह प्रथा केशवपन कथा या आपल्या समाजसुधारकांनी स्त्रीच्या आयुष्यातून कायमचा काढून टाकलेली आहे परंतु बलात्कार ही अशी विकृती आहे.
जी मोठ्या शहरात किंवा छोट्या गावात किंवा अख्ख्या भारतात कुठेही कधीही घडत असते ती का ही विकृती कसे तिथून काढायची फक्त सरकारने नियम खडक करून किंवा त्याची भीती दाखवून ही प्रश्न सुटणार आहेत का तर नाही कारण इतके आपल्याकडे नियम आहेत. गेल्या काही वर्षात भारतात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे बलात्कार भ्रष्टाचार भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन झाला लोकपाल बिल झालं आणि आम आदमी पार्टीचा जन्म झाला.
निर्भया बलात्कार हत्याकांडा विरुद्धही अनेक चर्चा झाल्या अनेक मुद्दे उचलले गेले समस्या शोधण्यात आल्या परंतु सरते शेवटी त्याचा काही उपयोग झाला नाही थोडक्यात कोपर्डी हत्याकांड इत्यादी पुढे चालूच राहिली आपल्याला समस्या समजल्या नाहीत उलट यामागच्या विविध विविध आपल्या समोर येऊ लागले त्यामुळे अधिकाधिक वादच निर्माण होत गेले कधी कडून पॉलिटिशियन करून ठेवायचं आणि समाजातील इतर घटक व महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलण्यापेक्षा जर गोष्टींकडे कल वाढत राहिला आणि वादविवाद होत राहिली परंतु त्याला कसे याबद्दल समस्यांवर चर्चा न करता वेळ जात राहिला.
बलात्कार रोखण्यासाठी किंवा त्याच्यावर उपाय म्हणून गेल्या अनेक वर्षात शासनाकडून आणि इतर समाजातील घटकांकडे पुरेपूर भरपूर प्रयत्न होत आहेतच परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नाही का हेच आपण आजच्या या विशेष लेखात पाहणार आहे. विविध विचारवंत समाजसेवक या गोष्टीवर कार्य करत आहेत एकीकडे समाज प्रबोधन करत राहणे, दुसरीकडे महिला सुरक्षेचे यंत्रणेवर कार्य करणे, तिसरीकडे समाजातील अनिष्ट गोष्टींना आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करणे तरतुदी करणे या तिन्ही गोष्टी गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहेतच परंतु त्याचा उपयोग शून्य आहे. त्याचा उपयोग शून्य अशासाठी आहे की या तिन्ही अंगांनी प्रयत्न सुरू आहेत परंतु ते विखुरलेले आहेत त्याचा एक संबंध नाही. या विखुरले पणाचा एकमत असेल याचं कारण म्हणजे आपलं बलात्काराच्या समस्या बद्दल निरनिराळे असलेला आकलन, या प्रयत्नांच्या विखुरले पण याचं कारण आहे.
बलात्काराची विकृत मानसिकता काय असते ..?
‌अनेक वर्षापासून बलात्कार रोखण्यासाठी उपाय, बलात्कार झाला की त्या नराधमाला फाशी द्या,पोर्न साईट बंदी, महिलांच्या कपड्यान विषयी अनेक माध्यमातून केले जाते मग त्यात राजकीय लोक येतात मुळ मुद्दा बाजूला राहतो ती पीडित महिला झुरून मरून जाते हेच आपल्या देशात बलात्कार वाढण्याचे मुळ कारण आहे. तर काही विद्यापीठात बलात्कार विषयांची अभ्यास मानसिकतेवर शोध सुरू आहे. त्यानुसार बहुतांश वेळा उत्तेजना किंवा वासना क्षमन करण्यासाठी हिंसक प्रेरणा हे बलात्कारच कारण नसत, बलात्कारामागे शारीरिक आणि मानसिक वर्चस्व प्रस्थापित करण्याची विकृत मानसिकता असते हे मुख्य कारण बलात्कार होण्याचे आहे. त्यामुळे आधी महिलांच्या कपडे किंवा इतर कोणत्याही गोष्टींवर अती शहाणे लोक बोलतात नंतर बलात्कार झालं की मेणबत्या घेऊन फिरतात त्यांनी ही मानसिकता लक्ष्यात घ्यावी कारण एकाद्रा कायदा कठोर निघाला की त्यातून बाहेर पडायचे इतर ४ पळवाटा असेच लोक निर्माण करतात उद्या. किती मोठे आरोप झाले अगदी जेल मध्ये जावं लागले तरी काही लोक फक्त पुरावे नाही या अभावी मंत्री, आमदार होतात बाकी जमवलेली माया त्यांचा जवळ कुबेराला ही लाजवेल इतकी असते असो.. तर बलात्काराचे मुळ कारण आपण पाहिले.
शिक्षेची तीव्रता वाढायला नको,शिक्षेची हमी वाढायला हवी..!
मित्रांनो/ मैत्रिणींनो/ मातांनो एक वृत्त जिल्हा प्रतिनिधी म्हणून बलात्कार या विकृत गोष्टीकडे पाहतात खूप संताप, त्रास होत आहे परंतु आपला समाज एक वेगळ्या गोष्टीकडे वाहत चालला आहे. या बलात्काराला अनेक वर्षापासून सुरु झालेले संस्कार हा शब्द वापरला जातो. संस्कार हा शब्द अपुरा पडतो कारण अनेक तरुण पोर्न फिल्म बागितल्या नंतर फक्त उत्तिजित होतात,बलात्कार करीत नाहीत, परंतु त्यांना जर हे माहीत असेल किंवा समाजातून असे संस्कार त्यांच्यावर झाले की बलात्कार करूनही कोणतीही शिक्षा त्यांना लौकर होणार नाही किंवा झाली तरी कायदच्या पळवाटा आहेतच सहज बाहेर पडू तर ते नक्कीच बलात्कार सारखा गंभीर गुन्हा करण्यास प्रवृत्त होतील मग ते कमी वयाचे तरुण असो किंवा वयात आलेले पुरुष असो…. या मागे समाजातील संस्कार कसे तुम्ही म्हणाल सांगतो समाजात गावगुंडांनी अगदी खून केला तरी राजरोज पणे मोकाट फिरतात, मोठे नेते अभिनेते किती वेळा आपल्या समोर कायद्याच्या चौकटी मोडतात,मग वाईट विकृती मनात असेलल्या त्या नराधमावर समाजात हे समोर घडत असेल तर काय संस्कार होणार ते बलात्कार एका खेळाप्रमाणे करणार त्यांना महिते काही होणार नाही लोक बोलतात, नंतर नवीन प्रकरण घडले की जुने विसरून जातात. कुठलाही विकृत मनुष्य एकदम बलात्कार करण्याची हिमत करीत नाही,तो मुलींना त्रास देतो, हात धरतो, शेरेबाजी करतो, त्याची ही रोजची सवय होते. मग इतर कोणती हे छोटे मोठे गुन्हे करतो पोलिस कोणत्या तरी राजकीय दबावाला बळी पडून सोडतात किंवा गुन्हा एवढा गंभीर नसतो त्यामुळे सहज तो सुटतो यात पोलिस यंत्रणेची काही चूक नाही ते बिचारे यंत्रणेचा भाग आहेत त्यांना ऑर्डर कायदा सांगेल ते करावे लागते मग किती या बलात्कारी लोकांचा राग आला डुटी करावी लागते. मग हा छोटे मोठे गुन्हे करूनही या विकृत मनुष्यांना. अनुशासन होत नाही तेव्हा त्याची हिमत वाढते बलात्काराची विकृती अडीच त्याचा मनात घर करून बसलेली असते. तो त्या कल्पनेत रमत असतो कधी महिला एकटी किंवा अशी सापडली की अनुशासन होत नाही या विचाराने वाढलेली हिमत आणि सामाजिक संस्कार या मुळे तो या विकृतीला वाट मोकळी करून देतो ज्या वेळी बलात्कार होतो त्या वेळी ती महिला किंवा मुलगी नक्कीच कामावरून घरी येताना ,किंवा परिवासोबत फिरायला गेले असताना किंवा अन्य कारणामुळे बाहेर गावी गेली असताना झालेले आहेत नेमके त्या वेळी त्या महिलेच्या ड्रेस कोड किंवा फिरायला जायचं कपडे परिधान केले असतात आणि आपण बलात्कार झालं की वाद विवाद करतो मुलींनी कपडे छोटी वाईट घातले म्हणून बलात्कार झाला कपडे छोटी हे फक्त निमित्त आहे जी विकृती मनात घर करुन बसली आहे त्या विक्तुतील संपण्यासाठी आपण समाज म्हणून या पुढे करणार आहोत की असेच बलात्कार पाहून वाद विवाद संवाद करून मेणबत्त्या घेऊन फिरनार आहोत.

बलात्कार विकृती नक्की आहे काय..? बलात्कार करायचे हिम्मत या नराधमाना येते कशी…?
आजकाल आपल्या समाजातच नातेवाईकडून बलात्कार होण्याचे प्रमाण वाढताना दिसते ते मुळ कारण ही बलात्काराची विकृती होय. बलात्कार या विकृतीचा शोध/ अभ्यास करताना समोर आली की, बलात्कारी व्यक्ती हा महिलेला सावज समजत असतो ते सावज हातात सापडेल तेव्हा तावडीतून सुटण्यासाठी जी घालमेल प्रयत्न चेहऱ्यावरचे त्या महिलेचे हावभाव असह्य भाव पाहण्याची कल्पना करणे म्हणजे बलात्कार विकृती होय, आधी कोणताच नराधम बलात्कार सारखे कृत करीत नाही करूच शकत नाही. तेवढी त्याचाच हिमत नसतेच तो ये विकृती मनात ठेऊन कल्पना करीत असतो. ही विकृती वेश्यागमन करून अधिक सुलभ करून आटोक्यात येणार नाही कारण मनात कल्पना केलेली सावज घेरण्याची, विजय मिळवण्याचे समाधान त्या विकृतीला मिळणार नाही. बहुतांश बलात्कार हे वासनांच्या तोल गेल्याने घडेलेल आपल्या समाजात दिसून येतात परंतु जास्त बलात्कार हे अश्या विकृती मुळे थंड डोक्याने केलेले असतात,कारण जर कोणी दारू प्यायला तर म्हणून बलात्कार झाला किंवा मुलींनी लहान कपडे घातले, उशिरा घरी आल्या म्हणजे बलात्कार झाला हे निष्कश काढणे पूर्ण चुकीचे आहे. कारण आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, अगदी सरपंच पासून राष्ट्रपती पर्यंत तसेच पोलिस, आर्मी,नेव्ही, प्रशासन, सर्व क्षेत्रात महिला या आघाडीवर आहेत त्यांना त्यांचा व्यवसायाला अनुसरून पोशाख परिधान करायची गरज भासते उदा पोलिस महिला, हवाई सुंदरी महिला, ओलंपिक खेळाडू कुस्ती खेळाडू महिला त्यामुळे सगळ्यांना आपल्याला आवडेल किंवा सुखरूप वाटेल असे कपडे परिधान करण्याचा पूर्ण अधिकार ,हक्क आहे. त्यामुळे या कारणामुळे बलात्कार झाला की महिलांना दोष देणं चुकीचं आहे. त्या ऐवजी ही विकृती संपविणे समजातून आजची काळाची गरज बनली आहे.
शेवटी समाज आपल्या सगळ्यांचा योगदान मधून घडत असतो. गेल्या असेल वर्षात झालेय त्या बलात्कार होऊन दुर्दैवी महिलांचा आणि आजही महिला कितीही शिक्षित असल्या मोठ्या हुद्यावर असल्या सर्व क्षेत्रात नाव कमवीत असल्या लाखो रुपये पगार घेत असल्या तरी या वाईट नजरा,विकृत्या या सर्व उच्च शिक्षित महिला ओळखतात अगदी प्रवासात,ट्रेन मध्ये कामाच्या ठिकाणी कुठे ही अगदी सहज फिरायला बाहेर पिकनिक ला परिवार सोबत गेल्या तरी या विकृती महिलांचा पाठलाग करीत असतात या महिलांचा एक भाऊ म्हणून या लेखात या वाईट विकृती च्या मुळावर घाव घालण्याची वेळ आली आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते, कारण की कीड कधी आपल्या घरात घुसेल याचा नेम नाही सरकार,राजकारणी कायदा काही करेल याची आशा सोडा ताई, मैत्रिणींनो कारण याचे मुख्य दोन कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे.
बलात्कार होण्याच्या मुळ समस्या ५ आहेत
१. सामान्यांना शासन यंत्रणेत नगण्य महत्त्वाचं असणं, ज्यामुळे शहाण्याला कोर्टाची पायरी पोलीस स्टेशनची पायरी नको झाली आहे. भारतीय लोकशाहीचा हा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे.
२. गुन्हेगारांना शासन यंत्रणा अनन्यसाधारण महत्त्व, मुळे बलात्कार झाल्यावर तक्रार करायला एखादा पुढे गेला तर त्याच्या श्रुती कुलकर्णी होते हे आता अलीकडच्या काळातील उदाहरण आहे. श्रुती सारखा शेवट नको असतो म्हणून आणि गप्प बसतो तक्रार करत नाही आणि मग कोपर्डी हत्याकांड चालते पुढे जाते दिल्ली निर्भया हत्याकांड सारखे करत राहते आणि त्याच सोबत कधी तरी उठून सेलिब्रिटी उठून आल्यानंतर मेणबत्या पेटवून सपोर्ट म्हणून त्या महिलेला किंवा तिला सपोर्ट करतात आणि त्यानंतरच आपण त्या सेलिब्रेटिंग मी सुद्धा असे काही उपक्रम राबवून स्वतःची पब्लिसिटी करण्याची वाईट प्रवृत्ती सध्या समाजात वाढत चाललेली आहे आणि मूळ विषयाचा आपण दूर चाललो याचा काही प्रमाणात परिणाम टेलीविजन वरील पिक्चर वाईट गाणे आणि अश्लील गाणे याचाही परिणाम काही प्रमाणात या विकृतीला पाठबळ देण्यासाठी पुरेसा आहे असे आपल्याला लक्षात येऊ शकते कारण गेल्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वी गाण्यातील अश्लीलता हा प्रकार अजिबात नव्हते परंतु गेल्या काही दहा-बारा वर्षात गाण्यात सुद्धा शब्दाशब्दात असतील पण असलेले आपण गाणी येताना दिसतात त्याचा परिणाम देखील या विकृतीला पाठबळ देण्यात मदत करीत असल्याचे काही सर्वांमधून समोर आलेले आहे याचा परिणाम आपल्या मुलांवर समाजात पडतोच परंतु अशा विकृतींना अधिक बळ देतो हे समोर आले आहे यावरही लक्ष आपण देणे गरजेचे आहे कारण सध्याच्या इंटरनेटच्या युगात आपण आणि आपण कुठल्याही मुलांना मुलींना किंवा कुठल्याही व्यक्तीला हे इंटरनेट किंवा ही साइट किंवा इतर गोष्टी वापरू नका अशा गंधी करू शकत नाही कारण एक बंद केल्यानंतर चार गोष्टी निर्माण करण्याची ताकद नसल्यामुळे आपण कितीही या गोष्टीला दाबले तरी येणार आहे त्यामुळे त्या गोष्टी करणे गरजेचे आहे.
३. एकच उपाय समोर दिसून येते की आपण यांना महिलांना मोकळेपणाने या गोष्टींवर बोलण्यास प्रवृत्त करावे त्यांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे आणि सर्वात बलात्कार झाल्यानंतर पीडित व्यक्तीला दोष देण्याची किंवा डेबिट करून त्यावर चर्चा करण्याची सवय किंवा पद्धत आपल्याला हद्दपार करायला हवी, शासन व्यवस्था अधिकाधिक जनताभिमुख करण्याची गरज आहे. अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप तर मुळीच नको कारण राजकीय हस्तक्षेपामुळे सहज साध्या वाटणाऱ्या प्रकरणांचे कशी विल्हेवाट लागली हे आपण सहज डोळ्याने पाहत आहे राजकारण्यांचे झाले परंतु जीव आणि इज्जत अनेक सामान्य लोकांची गेली हे गेले पाच ते दहा वर्षांत आपल्याला दिसून आलेला आहे.
४. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले पोलिस पाणी जुडी शियल रेफॉर्मस करणे गरजेचे आहे. आपला समाज अधिकाधिक प्रगती करीत आहे वेगाने प्रगती करत आहे आपल्या पुढील काही समस्या आणि आव्हाने बरीच मोठी आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादी योजना राबवायची झाली तर ती शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोचणे आधीच मधल्या भ्रष्टाचारमुक्त खाण्यापासून कसे बघता येईल यासाठी उपाय योजना करावी लागते तर दुसरीकडे एक कायदा परत निघाला शक्ती कायदा हा चांगलाच आहे परंतु याआधी अनेक कायदे आणि त्याच्यापासून पळवा काढायला वकील तयार कसे करतात हे बघण्यासाठी आपल्याला यंत्रणा लावला लावावी लागते. म्हणजे बेरोजगार बोलण्यात असतानाही निवडून येतात आणि भरती काढायची वेळ येते सामान्य मुलगा जेव्हा भरती होणार असे वाटत असेल त्यावेळी भरती निघणार असे वाटत असतानाच त्यावर ती घोटाळे करणारे पेपर फुटी करणारे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी इतर योजना करावी लागतात हीच मोठी शोकांतिका आपल्या समाजात वाढत चालली आहे याकडे कोणीच लक्ष देत नाही लक्ष देण्याची गरज आता तुमच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी तरी करावी लागणार आहे. एक चांगली योजना राबवण्यासाठी दहा भ्रष्टाचारी दहा वाईट विकृतींना म्हणण्याची किंवा त्यांना रोखण्याची वेळ आपल्या शासन यंत्रणेत आपल्यावर येऊन पडली आहे ती फक्त पडल्यामुळेच आपण त्या गोष्टीला जबाबदार आहोत आपण दुर्लक्ष केले आहे आता फळी आपणच बघतो आहे मी आता बलात्कार या वाईट विकृतीने त्यांना आपणच मेणबत्त्या लावते आपणच वाद-विवाद डिलीट करतो परंतु त्या पीडित व्यक्तीला संरक्षण किंवा वाचवण्यासाठी आपण समाज म्हणून काहीच करत नाही अनेक वेळा समोर आलेला आहे त्यावर प्रकाश टाकणारा हा एक युवा मराठा न्यूज चैनल स्पोर्ट चा छोटासा प्रयोग हा लेख जरी युवा मराठा न्यूज चैनल च्या मुंबई जिल्हा प्रतिनिधी यांनी समाजातील काही गोष्टींचा अभ्यास करून आणि समाजात घडणाऱ्या गोष्टींचा सगळ्यांच्या दाखला घेऊन आपले मत मांडले असले तरीसुद्धा या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात.
५. सामान्य जनतेचा फायदा आणि सूर्य स्थितीतील सहभाग शून्य आहे, वाढायला हवा यासाठी तक्रार यंत्रणा अधिकाधिक पारदर्शक व गतिमान करायला हवी. यासाठी सरकारची भांडून नव्हे तर सरकारच्या समन्वय नाही झाले पाहिजे. यासाठी सामाजिक बांधिलकी चळवळ उभी राहिली पाहिजे.

Previous articleग्रामसभेत विधवा प्रथा बंदी ठराव मंजूर
Next articleराज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा धडाका…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here