Home बुलढाणा माऊली हॉस्पीटलमध्ये एन्जोग्राफी एन्जोप्लास्टी युनिट रुग्णसेवेत

माऊली हॉस्पीटलमध्ये एन्जोग्राफी एन्जोप्लास्टी युनिट रुग्णसेवेत

182

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0004.jpg

माऊली हॉस्पीटलमध्ये एन्जोग्राफी एन्जोप्लास्टी युनिट रुग्णसेवेत
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा ब्रीद खरं ठरवत माऊली सुपर • स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये •एन्जोग्राफी युनिट आज रुग्णसेवेत रुजू झाले आहे. या युनिटचा शुभारंभ हभप तुकाराम महाराज सखारामपूरकर यांच्या हस्ते पार पडला. हभप पुरुषोत्तम हरी (गणेश) पाटील चॅरिटेबल ट्रस्ट शेगावच्या माध्यमातून माऊली सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल येथे हृदयाच्या रुग्णांकरीता कॅथलॅब (एन्जिओग्राफी व एन्जिओप्लास्टी) लहान मुलांची बिनटाक्याची हृदय शस्त्रक्रिया, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे

लवकरच कॅन्सरग्रस्त रुग्णांवर उपचाराची सुविधा

प्रास्ताविक करताना ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी त्यांनी संस्थेच्या सेवकार्याची माहिती दिली. तसेच लवकरच शेगाव येथे कॅन्सरवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु असे यावेळी सांगितले. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शेगावातील बहुसंख्य नागरीक बंधु भगिनी, डॉक्टर, उपस्थित होते.