Home नांदेड मुक्रमाबाद येथील वार्ड क्रमांक 2 मधील पाण्याची समस्या भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माननीय...

मुक्रमाबाद येथील वार्ड क्रमांक 2 मधील पाण्याची समस्या भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी सोडवली

36
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0007.jpg

मुक्रमाबाद येथील वार्ड क्रमांक 2 मधील पाण्याची समस्या भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी सोडवली
मुक्रामाबाद प्रतिनिधी बसवराज वंटगिरे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
2022 च्या उन्हाळ्यात मुक्रमाबाद येथील ग्रा.प.वार्ड क्रमांक २ मध्ये पाण्याची तिव्र टंचाई भासत होती.त्यामुळे या विभागाचे नेते शिक्षण महर्षी तथा नांदेड जिल्हा परिषदेचे गटनेते ,भाजपाचे जिल्हा अध्यक्ष मा.व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेब यांना बोअर मारुन देण्याची विनंती या वार्ड क्रमांक २ मधील नागरिकांनी केली.तेव्हा लगेच काल दि.१३ जुन रोजी बोअर मारुन दिले.तेही स्वखर्चातुन व या बोअरला पाणी देखील मुबलक असे लागले..तेव्हा बोअर चालु झाल्याबरोबरच या वार्डातील नागरिकांनी व वार्डातील सदस्यांनी युवानेते जि.प.सदस्य प्रतिनिधी तथा नवनिर्वाचीत चेअरमन सेवा सहकारी सोसायटी गोजेगाव मा.बबन पाटील गोजेगावकर यांना बोलावुन घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आले.व गोजेगावकर कुंटुबांचे जाहीर आभार मानण्यात आले.यावेळी मुक्रमाबाद शहरातील जेष्ट समाजसेवक मा.सुभाषअप्पा बोधणे,यांच्या शुभहस्ते पुजन करुन नारळ फोडण्यात आले.मा.उपसंरपंच बंडप्पा गंदीगुडे,विद्यमान उपसंरपंच सदाशिव बोयवार,मा.संरपचआसफअल्ली कोतवाल,व विद्यमान संरपंच प्रतिनिधी तथा ग्रा.प.सदस्य बालाजी बोधणे,ग्रा.प.सदस्य बालाजी पसरगे,मा.ग्रा.प.सदस्य काशिनाथ मामा ईदुंरे,वार्ड क्रमांक सहा चे ग्रा.प.सदस्य प्रतिनिधी राहुल ईदुंरे ,व यांच्यासह गावातील व वार्डातील असंख्य नागरिक उपस्थित होते..

Previous articleमाऊली हॉस्पीटलमध्ये एन्जोग्राफी एन्जोप्लास्टी युनिट रुग्णसेवेत
Next articleमहिला बचत गटाना ३२ लाख रुपयाचे कर्ज वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here