Home पुणे कासुर्डीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात संपन्न

कासुर्डीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात संपन्न

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220606-WA0022.jpg

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी प्रशांत नागणे,         पुणे, जय हिंद विद्यालय कासुर्डी इयत्ता 10 वि सन 2006-2007 स्नेह संमेलन मेळावा. जयहिंद विद्यालय कासुर्डी, सन 2006-2007 मधील वर्ग दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा अर्थात गेट-टु-गेदर हा कार्यक्रम दिनांक 5 जून 2022 या दिवशी यवत येथील शेरू ऍग्रो टुरिझम या ठिकाणी सर्व तात्कालीन बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या संयोजनासह सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी दहा वाजता सर्वांचे आगमन होण्यास सुरुवात झाली कार्यक्रमाचे उद्घाटन जय हिंद विद्यालय कासुर्डी येथील गुरुवर्य यांच्या हस्ते झाले यामध्ये प्रमुख उपस्थिती मध्ये जे के थोरात सर शेवते सर नाळे सर कांचन सर जगताप सर भोंगाने सर आणि शेंडगे सरांची उपस्थिती होती त्याच बरोबर विद्यार्थ्यांमधील राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष, युवा मराठा न्यूज दौंड प्रतिनिधी( पत्रकार) श्री प्रशांत नागणे, तसेच युवा मराठा न्यूज हवेली तालुका प्रतिनिधी(पत्रकार)श्री संजय वाघमारे त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस दौंड तालुका उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांची उपस्थिती प्रामुख्याने होती यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग व पत्रकार बांधवांचा सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल आणि श्रीफळ तसेच फेटे बांधून सत्कार करण्यात आला यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या गुरुजनांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये जगताप सर नाळे सर थोरात सर शेंडगे सर शेवते सर कांचन सर भोंगाने सर यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केला तर श्री जी के थोरात सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की समाज विद्यार्थी व शाळा यांच्या एकत्रित सहकार्यातून शाळेची प्रगती होऊ शकेल आणि माजी विद्यार्थी हे शाळेचा कना आहेत, समाजामध्ये जीवन जगत असताना आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि रोजच्या जीवनामध्ये व्यायामाला महत्त्व देणे गरजेचे आहे असे नाळे सरांचे मनोगतामध्ये व्यक्त झाले जगताप सरांनी आमचे विद्यार्थी एवढे चांगले घडू शकतात याबद्दल कौतुक केले विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल आर्थिक आणि सामाजिक बांधिलकी राखून त्यांची होणारी प्रगती पाहून भोंगाने सर आणि शिवते सरांनी कौतुकास्पद मनोगत व्यक्त केले त्याच बरोबर समाजात जगत असताना आपण आपल्या मित्र मैत्रिणींना विसरता कामा नये त्यांच्या सुख दुःखामध्ये आपण सहभागी होणे गरजेचे आहे आणि आपल्याला चांगल्या ची संगत असेल तर आपण चांगलेच घडतो असे मनोगत श्री कांचन सर आणि शेंडगे सर यांनी केले सर्व गुरुवर्यांनी हा स्नेह संमेलन मेळावा प्रथमच एवढ्या एकजुटीने एकोप्याने झालेला पाहायला असे सांगितले शाळेच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुवर्यांनी सांगितले की या शाळेने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचे व्यक्तिमत्व घडवले असून विविध क्षेत्रात कामगिरी करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनीया शाळेमुळे घडले असे प्रतिपादन केले या स्नेहसंमेलनात माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मिळून 38 जन सहभागी झाले होते पुन्हा एकदा एकत्र जमलेले माजी विद्यार्थी आठवणींमध्ये हरपून गेले होते प्रत्येक जण आपली शाळा कशी होते हे डोळ्यांमध्ये आठवत होता तब्बल 15 वर्षांनी वर्ग मित्रमैत्रिणी एकत्र जमल्याच्या स्नेह मिलनने शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला या कार्यक्रमाची प्रथम संकल्पना राहुल बेंद्रे यांना सुचतात त्यांनी आपले वर्गमित्र अनिल गायकवाड प्रशांत नागणे संजय वाघमारे अतुल आखाडे अहमद शेख यश कोळेकर संतोष गायकवाड गोपाळ रवळे विनोद आखाडे दिपक जगदाळे यश कोळेकर विलास आखाडे गणेश आखाडे महेश भिसे सलमान शेख सागर थोरात दत्ता देशमुख अनिल वाबळे समीर भोंडवे अमोल आखाडे राजवाडे आबा अनपट अमोल चव्हाण महेश भिसे तसेच वर्ग मैत्रिणी प्रियांका गोरे शितल अनपट सुरेखा गायकवाड सीमा दरेकर स्नेहल यादव सुनिता ठोंबरे शिल्पा भोंडवे अमोल वैशाली गदादे ज्योती थोरात मोहिनी थोरात यासह बाकी सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सहकार्यातून व संयोजनाने हा कार्यक्रम घडून आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय वाघमारे तर आभार प्रदर्शन श्री अनिल गायकवाड यांनी केली या कार्यक्रमाची सांगता चहा बिस्किटाच्या अल्प आहाराने झाली

Previous articleमहसूल अधिकारी व कर्मचारी विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी ! बुलढाणा जिल्हाधिकारी मात्र गप्प का..?
Next articleग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे.येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here