Home बुलढाणा महसूल अधिकारी व कर्मचारी विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी ! बुलढाणा जिल्हाधिकारी मात्र गप्प...

महसूल अधिकारी व कर्मचारी विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी ! बुलढाणा जिल्हाधिकारी मात्र गप्प का..?

246

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220603-WA0036.jpg

महसूल अधिकारी व कर्मचारी विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी !
बुलढाणा जिल्हाधिकारी मात्र गप्प का..?

संग्रामपुर विशेष प्रतिनिधी
(ज्ञानेश्वर पाटील दांदळे)

बुलढाणा:-जिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासनाचे मुख्य आधार आहेत प्रत्येक निर्णय कायदा व सुव्यवस्था अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जिल्हाधिकारी यांना पार पाडाव्या लागतात जिल्हा महसूल प्रशासनाचे मुख्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी असून ते जिल्ह्यातील इतर शासकीय विभागाचे समन्वय अधिकारी म्हणून देखील काम पाहत असतात. परंतु बुलढाणा जिल्ह्यात इतर शासकीय विभाग तर सोडाच चक्क महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी विरोधात तक्रारी होऊनसुद्धा तक्रारदार वेळोवेळी पुराव्यानिशी तक्रारीचा पाठपुरावा करतो परंतु आश्चर्याची बाब म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारी महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे विरोधात असल्यामुळे कित्येक महिने संबंधित आस्थापना विभागातच धूळखात पडून असतात. तर काही प्रकरणात “तारीख पे तारीख ” आणि आरोप असलेले भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी मात्र त्याच पदावर कार्यरत आहेत म्हणजे कालांतराने ते भ्रष्ट लोक कार्यालयीन पुरावे सुद्धा नष्ट करू शकतात. या अशा गंभीर बाबीकडे संबंधित चौकशी अधिकारी सुद्धा गप्प बसून शासनाची दिशाभूल करून भ्रष्ट लोकांची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे चालू आहे. वास्तविक पाहता इतर जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा पुरावा असल्यास त्यास तात्काळ निलंबित करून पुढील कार्यवाही करण्यात येते परंतु त्याविरुद्धच बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात काही भ्रष्ट महसूल अधिकारी व कर्मचारी ते संग्रामपूर तहसील चे असो या जिल्हाधिकारी कार्यालयातील असो अशा भ्रष्टाचारी महसूल अधिकारी व कर्मचारी यांची बुलढाणा जिल्हाधिकारी मात्र पाठराखण करीत असल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव देणे सारखाच प्रकार चालू असल्यामुळे “रक्षक बनले भक्षक” असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. भ्रष्टाचाराला लगाम लागण्या करिता व भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी करिता वेळीच विभागीय आयुक्त साहेब अमरावती यांनी दखल घेण्याची गरज आहे.

Previous articleभव्य रोजगार मेळावा
Next articleकासुर्डीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.