Home नांदेड ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे.येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा.

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे.येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा.

147

आशाताई बच्छाव

IMG-20220606-WA0048.jpg

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे.येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज 6 जुन रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय मौजे उंद्री प.दे. येथे राजदंड गुढी उभारुन छत्रपती शिवराय यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम गावातील राजकीय सामाजिक धार्मिक अध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रातील व समस्त शिवप्रेमी यांच्या उपस्थित शिवराज्याभिषेक दिन साजरा करून छत्रपती शिवराय यांच्या राज्यकारभारावर प्रकाश टाकून त्यांनी केलेले राज्यकारभार अतिशय उत्तम प्रकारे आणि सर्व जाती धर्मातील अठरापगड जातीला व बारा बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या चरणी शिवराज्याभिषेक दिना निमित्त त्रिवार मानाचा मुजरा करून समस्त शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गावातील असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

Previous articleकासुर्डीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात संपन्न
Next articleपाटोदा बु. धर्माबाद येथे श्री रोकडेश्वर मंदिरात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या महाप्रसादास भक्तगणाची अलोट गर्दी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.