Home पुणे शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी पिंपळे गुरवमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजनकार्यक्रमाला...

शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी पिंपळे गुरवमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजनकार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू मिळणार

68
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220523-WA0021.jpg

शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी पिंपळे गुरवमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजनकार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू मिळणार

पिंपरी, प्रतिनिधी :पिंपळे गुरव उमेश पाटील
येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिलांसाठी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांच्या ‘न्यू होम मिनिस्टर : खेळ रंगला पैठणीचा’ या बहारदार कॉमेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सह्याद्री क्रांतीनाना मळेगावकर ही या कार्यक्रमाची विशेष आकर्षण असणार आहे. खेळ रंगला पैठणी कार्यक्रमात सहभागी महिला स्पर्धकांमधून भाग्यवान महिलेस मानाची पैठणी मिळणार आहे.भव्य बक्षिसे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
एलसीडी टीव्ही, फ्रीज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, कुलर, सायकल, मोबाईल, मायक्रो ओव्हन, शिलाई मशीन, अ‍ॅक्वा गार्ड, गॅस शेगडी, होम थिअटर, इलेक्ट्रिक गिझर, 5 मिक्सर, 5 टेबल फॅन, 5 स्मार्ट वॉच, 5 एअर पॉड, 5 सोन्याच्या नथी, 5 पैंजन, 5 मेकअप बॉक्स, 1 भांड्याची झाल अशी भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

हा कार्यक्रम येत्या 26 मे रोजी सायंकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत सृष्टी चौक गार्डन मैदान, पिंपळे गुरव येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शामभाऊ मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous articleभाग्य उजळले ,वरवट तेल्हारा रोड चे रखडलेले काम 4 वर्षानंतर पूर्ववत चालु
Next articleमा. खासदार भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त अनसिंग व पिंपळगाव (डा.बं) येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here