Home वाशिम मा. खासदार भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त अनसिंग व पिंपळगाव (डा.बं) येथे भव्य...

मा. खासदार भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त अनसिंग व पिंपळगाव (डा.बं) येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

74
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220523-WA0015.jpg

मा. खासदार भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त अनसिंग व पिंपळगाव (डा.बं) येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

(अनसिंग: रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)
माजी पंचायत समिती सदस्य श्री पांडुरंग पांढरे यांच्या नियोजनाने
मा. खासदार भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळगाव येथे डॉ.सुर्वे साहेब, डॉ.खांजोडे साहेब, डॉ.नाईक साहेब व डॉ.आहेर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली.शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.शिबिरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना फळ वाटप केले. शिबिरांचा अनेक लोकांनी लाभ घेतला.कोरोना कालावधीनंतर अनसिंग गावामध्ये मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.शिबिरामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी हजर होते उपजिल्हाप्रमुख श्री महादेव सावके, मा.तालुकाप्रमुख श्री पांडूरंग पांढरे, सर्कल प्रमुख श्री दिलीप शिंदे, श्री सुधाकर मानमोठे सरपंच,श्री संतोष गावंडे,श्री जगन कापसे,श्री मुरलीधर निरगुडे,श्री नवनाथ निरगुडे,श्री चंदन धोंगडे,श्री ज्ञानेश्वर गोरे,श्री महादेव काळदाते, शे.सलीमभाई, शे. मुजाईद अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here