Home बुलढाणा अनिल देशमुख यांची जामीन मंजूर करा- (देशमुख समाजाची मागणी)

अनिल देशमुख यांची जामीन मंजूर करा- (देशमुख समाजाची मागणी)

50
0

राजेंद्र पाटील राऊत

अनिल देशमुख यांची जामीन मंजूर करा- (देशमुख समाजाची मागणी)

(संग्रामपूर प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार)
दिनांक २५ एप्रिल रोजी संग्रामपुर तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी संग्रामपूर यांना देशमुख समाज बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यामध्ये देशमुख समाज बुलढाणा जिल्हा वतीने एक दिवसीय लक्षणिय उपोषण करणार असल्याचे देशमुख समाज बांधवांनी सांगितले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख महाराष्ट्र् राज्य यांच्याविरूद्ध सूडबुद्धीने चुकीच्या मार्गाने चालू असलेला खोटा तपास तसेच चुकीची खोटी कार्यवाही थांबवून त्यांचा जामीन मंजूर करू निर्दोष मुक्तता होण्याकरिता तसेच देशमुख यांची जप्त केलेली प्रॉपर्टी त्यांना तात्काळ परत करावी अशी मागणी आज दि. 25 एप्रिल रोजी करण्यात आली असुन प्रशासनाने लक्ष्य ओढुन घेण्याच्या दृष्टिकोनातून एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन बुलढाणा जिल्हा मध्ये करणार असेही निवेदनात नमूद आहे. हे आंदोलन विलासराव देशमुख हे देशमुख समाज संघ जिल्हा अध्यक्ष बुलढाणा यांच्या नेतृत्वात केले जाणार आहे असे निवेदनात नमूद असून शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती केलेली आहे. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देतांना देशमुख समाजाचे जिल्हाध्यक्ष विलासराव देशमुख, रामराव देशमुख,
जानराव बाप्पू देशमुख ,
सागर देशमुख,श्रीजित देशमुख,ओमप्रकाश देशमुख,सतीश देशमुख, महादेव देशमुख,प्रशांत देशमुख, दीपक देशमुख, सुनील देशमुख तसेच संग्रामपूर तालुक्यातील इतर देशमुख समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here