Home बुलढाणा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आक्रमक!; कर्तव्यदक्ष SP म्‍हणाले, विक्री-पुरवठा-साठा करणाऱ्यांविरुद्ध कडक...

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आक्रमक!; कर्तव्यदक्ष SP म्‍हणाले, विक्री-पुरवठा-साठा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणार!!

28
0

राजेंद्र पाटील राऊत

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आक्रमक!; कर्तव्यदक्ष SP म्‍हणाले, विक्री-पुरवठा-साठा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणार!!

बुलडाणा ( ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा ) जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री, पुरवठा अथवा साठा करणाऱ्यांचा शोध घेण्यात यावा. कुठेही अंमली पदार्थांबाबत विक्री, पुरवठा किंवा साठा निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करावी. गुन्हे दाखल करून आरोपींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी आज, २६ एप्रिलला दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दालनात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक झाली. त्यावेळी आढावा घेताना श्री. चावरिया बोलत होते. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त श्री. राठोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, सहायक आयुक्त (औषधे) अतुल बर्डे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बळीराम गिते आदी उपस्थित होते.शेड्युल्ड ड्रग्ज विक्री करणाऱ्या औषधी दुकानांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना देत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. चावरिया म्हणाले, की ड्रग्ज असोसिएशनची बैठक बोलवावी. जिल्ह्यात अफू किंवा गांजाची लागवड होत असल्याची माहिती आल्यास निदर्शनास आल्यास तातडीने कारवाई करावी. त्यासाठी पोलीस ठाणेनिहाय आढावाही घेण्यात यावा. कुरिअर किंवा पोस्टाच्या माध्यमातून येणाऱ्या पार्सलची कसून तपासणी करावीविदेशातून येणारे पार्सल किंवा विदेशात पाठविण्यात येणाऱ्या पार्सलच्या तपासणीसोबतच देणाऱ्या तसेच घेणाऱ्या व्यक्तीची कागदपत्रेसुद्धा तपासावीत. जिल्हास्तरावर अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. तसेच कारखाने बंद असल्यास त्यावर विशेष लक्ष ठेवावे. एनडीपीएस अंतर्गत गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांच्याकरिता प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात यावे. यावेळी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here