Home नांदेड डॉ.राहुल कांबळे नवी दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानीत. नवी...

डॉ.राहुल कांबळे नवी दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानीत. नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअम मधील कार्यक्रमावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

51
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220416-WA0137.jpg

डॉ.राहुल कांबळे नवी दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानीत.

नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअम मधील कार्यक्रमावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मागील दहा वर्षापासून सतत अविरतपणे सामाजिक कार्यात व पशु वैद्यकीय सेवेमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावणारे,
अनुसूचित जाती/जमाती वि.जा./भ.ज.इमाव/विमाप्र शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचारी
मंत्रालयीन संघटना पशुसंवर्धन विभागाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा (संस्कार विभाग) मुखेड तालुका सचिव डॉ.राहुल तुळशिराम कांबळे यांना जय भारत संस्था नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीच्या अनुषंगाने दिला जाणारा यावर्षीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर “राष्ट्रीय रत्न” पुरस्काराने सन्मानीत . नवी दिल्ली येथील संसद भवन जवळील तालकटोरा इनडोअर स्टेडियम मध्ये दि.१४ एप्रील २०२२ रोजी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील काही व्यक्तींसह मुखेड तालुक्यातील डॉ.राहुल कांबळे यांना
जय भारत संस्था नवी दिल्ली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मल्लीनाथ महाराज. केंद्रीय
सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले
पि.आर.पि‌.पक्षप्रमुख मा.आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे
नवी दिल्ली चे समता सैनिक दलाचे प्रमुख
शंकर पाल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन चे सदस्य आनंद
संपादक सिद्धार्थ तलवारे.दिल्ली येथील आम आदमी पार्टीचे आमदार अमरसिंह दिल्ली चे महापौर सुनील प्रभू मुंबई उच्च न्यायालयाचे तथा दिल्ली सुप्रीम कोर्टाचे अॅड. विजय पट्टेबहादुर, प्रसिद्ध दिग्दर्शक श्री झगडे,कर्नाटक राज्याचे आमदार डी.एस.पाटील,माजी प्राचार्य तस्मिल पटेल
दिल्ली सुप्रीम कोर्टाचे अॅड.सम्यक बौध्द.दिल्ली सुप्रीम कोर्टाचे अॅड.मनिषा आंबेडकर आदींसह देशातील विविध राज्यातील सामाजिक राजकीय प्रमुख मान्यवरांच्या हस्ते “डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानपत्र. सन्मानचिन्ह.असे आहे. मुखेड तालुक्यासह नांदेड जिल्हाभरात पशुवैद्यकीय सेवा सह फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीमध्ये मागील १० वर्षांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने मुखेड शहरासह तालुकाभरा मध्ये १८ तास अभ्यासक्रम उपक्रम राबविणे,आणि पशुंची प्रामाणिक पणे सेवा करणे, तसेच सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,राजकीय,क्रीडा यासह विविध सामाजिक कार्यक्रमात  सहभाग नोंदवणे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.  या पुरस्कार निवडीबद्दल अनुसूचित जाती/जमाती वि.जा./भ.ज.इमाव/विमाप्र शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचारी मंत्रालयीन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.भारत वानखेडे,डॉ.उत्तमराव सोनकांबळे (महाराष्ट्र प्रदेश.
आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते दशरथ लोहबंदे,गंगाधर सोंडारे.डॉ.संजय पाटील,स्वाभिमान भारत न्यूज चे संपादक भारत सोनकांबळे,सुधाकर सोनकांबळे यांनी व मुखेड तालुक्यासह जिल्हाभरातील राजकीय नेत्यांकडून व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने डॉ.राहुल कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here