Home सोलापूर आदिनाथ सुरु होण्यासाठी अडथळा दूर होण्याच्या मार्गावर? पोलिस अधीक्षक सातपुते यांच्या उपस्थितीत...

आदिनाथ सुरु होण्यासाठी अडथळा दूर होण्याच्या मार्गावर? पोलिस अधीक्षक सातपुते यांच्या उपस्थितीत बँक व कर्मचाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

45
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220405-WA0139.jpg

आदिनाथ सुरु होण्यासाठी अडथळा दूर होण्याच्या मार्गावर? पोलिस अधीक्षक सातपुते यांच्या उपस्थितीत बँक व कर्मचाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

करमाळा (सोलापूर) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत बँकेने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. 2020 मध्ये औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने ‘आम्ही कामगारांच्या खात्यावर साखर विक्रीतून पैसे जमा करण्यास तयार आहोत. १५० रुपयांच्या निकालापेक्षा आणखी वाढीव रक्कम हवी असल्यास, तशा प्रकारे त्यांनी त्यांचे म्हणणे कोर्टामध्ये मांडावे. कोर्टाने वाढीव रक्कम देण्याविषयीचे आम्हाला निर्देश दिले. तर त्याचा आदर करुन पैसे देण्यासाठी बांधील राहु,’ असे आश्वासन एमएससी बँकेचे कार्यकारी संचालक देशमुख व राठोड यांनी कामगारांना दिले आहे.
यावेळी उपस्थित बँकेचे देशमुख म्हणाले, ‘कारखाना सुरू व्हावा, अशी आमची इच्छा आहे. कारखान्याच्या अवतीभोवती उसाचे मोठे क्षेत्र आहे. कारखाना बंद राहिल्यामुळे तालुक्याची आर्थिक घडी बंद पडली आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे हे आम्ही जाणतो. सरकारच्या नियमानुसार सर्व गोष्टी कराव्या लागतात. कारखाना सुरू करण्यासंबंधीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होत आल्या आहेत. व कारखाना लवकरात- लवकर सुरू होईल, असे आशादायक वक्तव्य बँकेचे कार्यकारी संचालक देशमुख यांनी केले आहे.

Previous articleपाणिप्रश्न पेटला संगितराव भोंगळ यांनी उपसले उपोषणअस्त्र पातृर्डा ग्रामस्थांचा पाणीबाणीचा लढा!
Next articleहळगाव सोसायटीच्या चेअरमनपदी जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांची बिनविरोध निवड गावकारभार गावगाडा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here