• Home
  • संग्रामपूरचे तहसिलदार सिध्देश्वर अश्शील शिवीगाळीत प्रसिध्द..! तलाठी तक्रार राहिलीच बाजूला; मुद्दा सोडून बेताल वक्तव्ये करणाऱ्या तहसिलदारास पदाची देखील मर्यादा गुंडाळून टांगली वेशीला…!!

संग्रामपूरचे तहसिलदार सिध्देश्वर अश्शील शिवीगाळीत प्रसिध्द..! तलाठी तक्रार राहिलीच बाजूला; मुद्दा सोडून बेताल वक्तव्ये करणाऱ्या तहसिलदारास पदाची देखील मर्यादा गुंडाळून टांगली वेशीला…!!

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220319-202725_WhatsApp.jpg

संग्रामपूरचे तहसिलदार सिध्देश्वर
अश्शील शिवीगाळीत प्रसिध्द..!
तलाठी तक्रार राहिलीच बाजूला; मुद्दा सोडून बेताल वक्तव्ये करणाऱ्या तहसिलदारास पदाची देखील मर्यादा गुंडाळून टांगली वेशीला…!!
राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाकडून तहसिलदाराचा निषेध..!!
मंत्रालयात देणार निवेदन…
(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुंबई – असे म्हटले जाते की,ज्याच्या हाती ससा तो पारधी..येथे मात्र विदर्भातून एक गंभीर स्वरुपाची घटना समोर येत आहे.बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याची जबाबदारी ज्या तहसिलदारावर आहे त्या तहसिलदारानेच बेताल वक्तव्ये करुन एका जबाबदार पत्रकारासमोर अश्शील भाषेत समोर बसलेल्या लोकांना वाळूमाफीयाच्या नावाने शिवीगाळ करावी हा प्रकार नेमके काय दर्शवितो? या तहसिलदाराला पाठबळ कुणाचे?नेमका आशिर्वाद कुणाचा? तहसिलदार साहेबांचा नेमका गाँडफादर कोण? की, साहेब…आपल्या पदाचे भान व मर्यादा विसरुन अश्शील शब्दात शिवीगाळ करुन बेताल वक्तव्ये करतात हा खरोखरच वरिष्ठांनी संशोधनाचा विषय ठरावा..आणि अशा तहसिलदारावर तात्काळ कठोर कारवाई करावी.संग्रामपूर तहसिलदाराच्या या कृत्याचा राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ तीव्र निषेध करीत असून,सोमवारी मंत्रालयात या तहसिलदाराविरोधात तक्रार निवेदन देऊन तात्काळ बदलीची मागणी केली जाणार आहे.
थोडक्यात या घटनेची पार्श्वभूमी अशी की,संग्रामपूर तालुक्यात तहसिलदार सिध्देश्वर वरणगांवकर यांचा वचक व दरारा अजिबात राहिलेला नसून,वाळूमाफीया रेशनमाफीया यांनी अक्षरशः थैमान घातले आहे.त्यातल्या त्यात महसुल खात्यातील ग्रामीण भागात महत्वाचा दुवा म्हणून ओळखले जाणारे तलाठी व मंडळ अधिकारी हे आपल्या सजेत न राहता फक्त माफीयाकडून हप्ता वसूलीत मग्न राहत असल्याचेच चित्र या तालुक्यात बघावयास मिळत आहे. पातुर्डा येथील तलाठी तांबट हे सजेच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याबाबतची बातमी युवा मराठा वृतपत्राच्या आजच्या अंकात प्रसारीत करुन संबधित तलाठीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.असे असताना दि. 16/3/2022रोजी साजा आवार चे प्रभारी तलाठी तांबट कर्तव्यावर हजर नसून मुख्यालयी राहात नसल्याबाब तहसीलदार यांच्याकडे तलाठी यांच्या बद्दल त्यांची प्रतिक्रिया घेण्याच्याअनुषंगाने आमचे संग्रामपूर तालुका विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे हे तहसिलदार साहेबांच्या भेटीला गेले असता तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर यांनी तांबट या तलाठयाबाबत असलेल्या तक्रारीनुसार पुढे काय कारवाई करणार ही प्रतिक्रिया देणे तर दुरच मात्र प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांचेसमोरच कार्यालयात इतर अवैद्य गौण खनिज चोरीची तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांबद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन मी किती खमक्या तहसीलदार आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न तहसिलदार वरणगावकर यांनी केला.आणि तो व्हिडीओ युवा मराठा न्युजच्या हाती लागला असून,अशा बेजबाबदार तहसिलदारावर तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी आता राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिका-यांना निवेदने देण्यात येऊन हे आंदोलन प्रखर स्वरुपात छेडण्यात येईल.

anews Banner

Leave A Comment