Home उतर महाराष्ट्र ह.भ.प.सतिलाल महाराज यांच्या मधुर किर्तननाने “जगदगुरू ‘ संत तुकाराम बीज निमित्त महाप्रसादाचे...

ह.भ.प.सतिलाल महाराज यांच्या मधुर किर्तननाने “जगदगुरू ‘ संत तुकाराम बीज निमित्त महाप्रसादाचे वाटप

304
0

राजेंद्र पाटील राऊत

ह.भ.प.सतिलाल महाराज यांच्या मधुर किर्तननाने “जगदगुरू ‘ संत तुकाराम बीज निमित्त महाप्रसादाचे वाटप

दिपक जाधव-युवा मराठा न्युज नेटवर्क

धुळे/साक्री – सप्तपाताळेश्वर भजनी मंडळ वासखेडी यांच्या वतीने ह.भ.प.सतिलाल महाराज म्हसदीकर यांच्या कीर्तनाने’जगदगुरु’तुकाराम बीज साजरी करण्यांत आली.
करोना परस्थितीचे सामाजिक भान जोपासत वासखेडी येथील विठ्ठल मंदिरात सकाळी १०:०० वाजता जगद्गुरु तुकारामांचे व विठ्ठल रखुमाई, यांच्या मुर्तीच्या विधिवत ,पुजा आरती,हरिपाठ करण्यांत आले.आरतीचा मान माझी संरपंच सौ,ठाकरे यांचे चिरंजीव, ड्रॉ. महेश ठाकरे सपत्नीक यांना देण्यात आला. नंतर कार्यक्रमाला सुरूवात करत , गावातुन हरीपाठाच्या गजर करत पालखी मिरवणुक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत ,ह.भ.प.उमेश नेरकर ,दादाजी नेरकर,अमृत कुवर,परशराम गवळे,अमृत मुजगे,रावसाहेब नेरकर,आत्माराम सुर्यवंशी, वसंत कुवर, दंगल मुजगे, विनायक नांद्रे,दादाजी कुवर, शांताराम कुवर,डॉ.महेश ठाकरे,पत्रकार दिपकभाऊ जाधव. तसेच तरून भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, ग्रामस्थ, बालगोपाळ जल्लोषात मिरवणुकीचा आनंद घेत मिरवणुकीचा विठ्ठल मंदिरासमोरील चौकाच्या समारोप करण्यांत आला.
मंदिरात भजनी मंडळातील ज्येष्ठांनी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टींना उजाळा देत ,त्यांचे समाज जीवन घडविण्यात असलेले बहुमुल्य योगदान बघता,आपणही समाज म्हणुन त्या दृष्टीने प्रयत्नं करावेत ,अशी अपेक्षा व्यक्त करण्यांत आली,या कार्यक्रमा निमित्ताने समाजाने वृक्ष लागवड करण्यांची हि सुध्दा अपेक्षा करण्यांत आली, तुकाराम बीज निमित्ताने,रात्री ह.भ.प.सतिलाल महाराज यांच्या कीर्तनातून आनंदमय वातावरणात तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आस्वाद घेत विठ्ठल मंदिर परिसर महाराजांच्या अभंगाने चित्रीत झाला. कीर्तन समारोप प्रसंगी सतीलाल महाराज व भजनी मंडळ वासखेडी परीसरातील भजनी मंडळ यांचे आभार मानत .कार्यक्रम उद्याच्या महाप्रसादाने समाप्त होईल असे जाहीर करून कीर्तन समारोप करण्यांत आला. कार्यक्रम यशस्वी ते साठी भजनी मंडळ व ग्रामस्थ ,तरून मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here