राजेंद्र पाटील राऊत
महावितरण चा कारभार, दिव्याखालीच अंधार
वाशिम:(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- अनसिंग शहरातील नागनाथ चौक या ठिकाणी विजेचे खांब हे पूर्णपणे वाकलेले असून या ठिकाणी राहणार्या ला अडचण येत आहे. तसेच या विजेच्या खांबा मुळे जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. महावितरण कार्यालय विभाग यांना निवेदन देऊन 11 महिने पूर्ण झाले. याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.जागे हो ,जागे हो,जागे हो मा.सहाय्यक अभियंता साहेब जागे हो अनसिंग शहरातील मुख्य भागातील विजेचे खांब नविन उभे करण्या बाबत तुम्हाला निवेदन देऊन ११ महिने झाले पण तुम्ही काय कार्यवाही केली नाही आता तर खातरी झाली आहे तुम्ही झोपीत आहात,हे खांब होतील की नाही असा प्रश्न पडतोय? तुम्हाला विचारल तर तुम्ही बोलता की आमच्या कडे पोल उभे करणारे माणस नाही मग अनसिंग शहरात विज वितरण कार्यालयच काय काम आहे बंद करा तुमची दुकानदारी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक आहोत पहिले हात जोडून,काम नाही झाले तर हात सोडून काम करून घोऊ खळखट्याक ची वाट बघु नका,आसा इशारा यश चव्हाण महाराष्ट्र सैनिक यांनी प्रसार माध्यमचा मार्फत दिला.