Home गडचिरोली उद्याच्या भविष्याकरिता पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाणी संवर्धनाकरिता युवकांनी व सामाजिक संस्थांनी...

उद्याच्या भविष्याकरिता पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाणी संवर्धनाकरिता युवकांनी व सामाजिक संस्थांनी पुढे येऊन काम करावे– अनुप कोहळे यांचे आवाहन पाण्याचे संवर्धन करून केली युवकांनी होळी साजरी

136
0

राजेंद्र पाटील राऊत

उद्याच्या भविष्याकरिता पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाणी संवर्धनाकरिता युवकांनी व सामाजिक संस्थांनी पुढे येऊन काम करावे– अनुप कोहळे यांचे आवाहन

पाण्याचे संवर्धन करून केली युवकांनी होळी साजरी               गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चामोर्शी// दिवसेंदिवस पाण्याची टंचाई वाढत चालली आहे आणि होळी च्या  सणात सर्वत्र पाण्याचे अपव्यय होत असते. अशा परिस्थितीत खास होळी निमित्त अत्यंत साध्या पध्दतीने होळी साजरी करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व  जलजागृती आणि जलसंवर्धनाकरिता सामाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे यांच्या नेतृत्वात युवकांनी आमगाव (म.) दत्त मंदिर टेकळी जवळ च्या नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. उद्याच्या भविष्याकरिता पाणी जपून वापरणे व पाणी संवर्धन करणे काळाची गरज असून या करिता युवकांनी व सामाजिक संस्थांनी पुढे येऊन काम करावे असे आवाहन अनुप कोहळे यांनी युवकांना केले आहे. यावेळी जलसंपदा विभाग चे अधिकारी प्रतीक बोदलकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद चिंतलवार, वीर तानाजी मालुसरे युवा मंडळाचे अध्यक्ष निखिल शेट्टीवार, सचिव आकाश बर्लावार,  सदस्य जितेश शेट्टीवार, कपील मूलकलवार, समीर मूलकलवार, आकाश मूलकलवार, तेजस भांडेकर,  निखिल चूधरी, निधड कोहपरे, युवा उद्योजक गजानन कुनघाडकर, अक्षय भांडेकर  सह वीर तानाजी मालुसरे युवा मंडळ वालसरा व छत्रपती शिवाजी युवा  मंडळ राजनगट्टाचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here