Home अमरावती सरकारी शाळांना आता एकाच रंगाचा ड्रेस कोड: नवीन शैक्षणिक सतरा पासून होणार...

सरकारी शाळांना आता एकाच रंगाचा ड्रेस कोड: नवीन शैक्षणिक सतरा पासून होणार अंमलबजावणी.

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20240310_202337.jpg

सरकारी शाळांना आता एकाच रंगाचा ड्रेस कोड: नवीन शैक्षणिक सतरा पासून होणार अंमलबजावणी.
——–
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
राज्य शासनाने’एक राज्य एक गणवेश’चा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये आता एकाच रंगाचा गणवेश राहणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या ३ लाख ६ हजार ४२ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट यासाठी मान्यता दिली आहे. येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या प्राथमिक शाळेमध्ये नवा गणवेश दिला असून, अन्नशाळा नाही यापुढे अशाच प्रकारचा गणवेशाचा पॅटर्न राबवावा लागणार आहे. शैक्षणिक वर्ष संपत्ती येत असल्याने पुढील शैक्षणिक 17 पासून या निर्णयावर अंमलबजावणी केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थी या निर्णयामुळे एका ठिकाणी दिसणार आहेत तथापि हे गणवेश वेळेत मिळावे, अशी मागणी देखील होत आहे. यात पहिली ते चौथीपर्यंतच्या मुली करतात आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा याचे एकत्रित असलेले स्वरूप म्हणजे पीनो फ्रॉक असा पॅटर्न राहणार आहे. पाचवी ते सातवी पर्यंतच्या मुलींना शर्ट व स्कर्ट अशा प्रकारचा गणवेश राहणार आहे. तसेच आठवीतील मुलीसाठी आकाशी रंगाचा कुर्ता व गळद निळ्या रंगाची सलवार असा पॅटर्न असून त्यावर निळ्या रंगाची ओढणी असणार आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाचे हाफ पॅंड असा गणेश असेल. तसेच आठवीतील मुलांसाठी फुल पॅन्ट व हाफ शर्ट ही गणवेश रचना असून सर्व विद्यार्थ्यांच्या शर्टावर शोल्डर स्ट्रीट व दोन खिसे ठेवणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट असाल गणवेश देण्यात येणार आहे
सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनाही याच प्रकारचा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत समग्र शिक्षा अभियान मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा दोन गणवेश दिले जाणार आहेत. या गणवेशाची रचनाही निश्चित केली आहे. नवीन शैक्षणिक क्षेत्रापासून या योजनेचे अंमलबजावणी होईल असे बुद्धभूषण सोनवणे शिक्षणाधीकारी(प्राथमिक) यांनी माहिती दिलेली आहे.

Previous articleदिनेश बुब निर्दलयी निवडणूक मध्ये उमेदवारी लढत असेल तर त्यांची क्षमता असून, मतदारांना जिल्ह्यातील आज सुदाम काका देशमुख यांची आठवण येते.
Next articleगृहिणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here