Home गडचिरोली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयावर शिवसेनेचा ‘हल्लाबोल’…. मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद...

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयावर शिवसेनेचा ‘हल्लाबोल’…. मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची समस्या

56
0

राजेंद्र पाटील राऊत

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयावर शिवसेनेचा ‘हल्लाबोल’….

मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची समस्या                                                                            गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांचा आंदोलनात सहभाग

गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करून सुस्तावलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात आज १५ मार्च रोजी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले
कॉम्प्लेक्स परिसरातील विश्रामगृह परिसरात शेकडो शिवसैनिक गोळा झाल्यानंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयावर धडक देण्यात आली. जय भवानी – जय शिवाजी, मौशीखांब – मुरमाडी जि.प.क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती झालीच पाहिजे, शिवसेना प्रमुख मा,बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख मा,उध्दव साहेब ठाकरे, युवासेना प्रमुख मा,आदित्य साहेब ठाकरे यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणानि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्याल्याचा परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला. शिवसैनिकांच्या आंदोलनाची तिव्रता लक्षात घेता पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.ऐन. आर.चिंतावार यांना मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्याची समस्या अवगत करून देण्यात आली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ग्रामीण भागाच्या रस्ते विकासासाठी शासनाकडून मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असतांनाही
मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती करण्यात न आल्याने शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. शिवसेनेचे प्रखर आंदोलन पाहून प्रधानमंत्री ग्रामसडक योजन कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री.ऐन. आर.चिंतावार यांनी कार्यालयाबाहेर येऊन आंदोलनाचे प्रमुख शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली.मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील दिभना – अमिर्झा – मुरमाडी, उसेगाव – गिलगाव, आंबेशिवणी – भिकारमोशी, मौशीचक – कातखेडा, मौशीखांब – मौशीचक या पाच रस्त्यांची गेल्या काही वर्षापासून दुरावस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या मार्गावर अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढले असून दुचाकी चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाच्या अभियंत्यांकडे केली.
तसेच मोहटोला ते नीमगांव रस्त्यावर मोठा पुल नसल्याने पावसाळयात या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सदर रस्त्यावर मोठया पुलाचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली
शिवसेनेचे प्रखर आंदोलन पाहून प्रधानमंत्री ग्रामसडक योजन कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री. ऐन. आर.चिंतावार यांनी कार्यालयाबाहेर येऊन आंदोलनाचे प्रमुख शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली. रस्ते दुरूस्तीच्या मागण्या तातडीने सोडविण्यात येतील असे आश्वासन अभियंता श्री,ऐन. आर.चिंतावार यांनी दिले. येत्या महिनाभरात मौशीखांब मुरमाडी जि.प.क्षेत्रातील रस्ते दुुस्स्तीची कामे मंजूर न झाल्यास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना बाहेर फिरू देणार नाही,असा इशारा शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आंदोलनाप्रसंगी दिला.या प्रसंगी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंद भाऊ कात्रटवार,सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे,यादवजी लोहबरे,नवनाथ ऊके,स्वप्निल खांडरे,निकेश लोहबरे,संदीप भुरसे,गणेश दहलाकर,रविंद्र ठाकरे,हिवराज उन्दिरवाड़े,विठ्ठल उन्दिरवाड़े, शांताराम टेम्भूर्ण, केशव मड़ावी,हरिदास सहारे, पंढरी ठाकरे,सोमा ठाकरे,लक्ष्मण निकुरे,लोकचंद ढोने, साहिल निकुरे,दीपक ठाकरे,सचिन निलेकर,अमोल कुमरे,अशोक धनबोले,चुनाराम मुनघाते,हरिदास झरकर,प्रकाश अलबोले,रेमजी मुनघाटे,भजन गेडाम,यशवंत लकुड़वाहे,संदीप ठाकरे,संजय चांग, लालाजी धनकोल्हे,डंबाजी घरमोड़े,दीपक नंनवारे,अनिल दोड़के,मुकरु दोड़के,रमेश कन्नक्के, मनोज मड़ावी,प्रकाश चौधरी, नरेंद्र धारने, विजय जवाड़े,बंडू गेडाम,रमेश टेम्भूर्ण, रवि कुमरे,यशवंत लकुड़वाहे, मनोहर ठोम्बरे, प्रकाश मड़ावी,भाष्कर लोहबरे, युवराज कुलमेठे, घनशाम दोड़के,विष्णु वासेकर,संजय उसेंडी,अनिल आलम,पंकज पिपरे, विनोद तिजारे यांच्यासह मौशिखांब,मुरमाडी परिसरातील शेकडो शिवसैनिक सहभागी झाले

Previous articleअपंग बांधवांना पाच टक्के निधी नगरपालिका व ग्रामपंचायतने खर्च करावा
Next articleकसबे तडवळे ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार घरकुल घोटाळा चौकशीची केली जिल्हाधिकाऱ्यांकडे माघणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here