• Home
  • 🛑 १२ सप्टेंबरपासून ८० विशेष ट्रेन धावणार….! रेल्वे प्रशासनाची माहिती 🛑

🛑 १२ सप्टेंबरपासून ८० विशेष ट्रेन धावणार….! रेल्वे प्रशासनाची माहिती 🛑

🛑 १२ सप्टेंबरपासून ८० विशेष ट्रेन धावणार….! रेल्वे प्रशासनाची माहिती 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕ रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आनंदाची बातमी दिली आहे. लॉकडाउनच्या काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष ट्रेनची संख्या वाढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पावलं उचलण्यास सुरू केले आहे. या अंतर्गत १२ सप्टेंबरपासून ८० नव्या विशेष रेल्वे (४० पेअर्स) धावणार असून, यासाठी १० सप्टेंबरपासून तिकीट आरक्षणास सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यांनी एक महत्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.

कोरोना काळात रेल्वे प्रवासावर निर्बंध आणले गेले होते. शिवाय, रेल्वेंची संख्या देखील कमी करण्यात आली होती. मात्र, टाळेबंदी शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात विशेष ट्रेनची संख्या वाढण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

पुढील काही महिन्यात दसरा, दिवाळी, छठ पुजासारखे सण पुढील काळात असल्याने या दरम्यान रेल्वेची संख्या वाढवण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात रेल्वेकडून विशेष ट्रेनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाय, रेल्वेंमध्ये गर्दीची बाब लक्षात घेता रेल्वेकडून ४० पेअर्स नव्या विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दसरा, दिवाळी व छठ पुजेसाठी रेल्वेची मोठ्याप्रमाणावर मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभागाकडून या विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत.

मुंबई, कोलकाता, लखनऊसुरू आहे. सध्या विशेष रेल्वेच्या नावाने २३० एक्स्प्रेस ट्रेन्स चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये ३० राजधानी एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे.⭕

anews Banner

Leave A Comment