• Home
  • 🛑 रत्नागिरी ग्रामीण भागातील आँनलाईन शिक्षणाकडे लक्ष देण्याची मागणी :- खंडागळे 🛑

🛑 रत्नागिरी ग्रामीण भागातील आँनलाईन शिक्षणाकडे लक्ष देण्याची मागणी :- खंडागळे 🛑

🛑 रत्नागिरी ग्रामीण भागातील आँनलाईन शिक्षणाकडे लक्ष देण्याची मागणी :- खंडागळे 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी :⭕ राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शासन योग्य वेळी निर्णय घेईलच, मात्र ग्रामीण भागातील ऑनलाइन शिक्षणाचा जो बोजवारा उडाला आहे, त्याकडे शासनाने आधी लक्ष द्यावे, अशा आशयाचे ट्विट रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

ग्रामीण भागातील शिक्षणाबाबत शासनाला जाब विचारायला हवा. मीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची अधिक चिंता वाटते. कोकणातील ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्कची मोठी समस्या आहे. फोर जी नेटवर्कलादेखील इंटरनेट चालत नाही. अशी स्थिती अनेक भागात आहे.

एकीकडे शहरी भागात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असताना दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र नेटवर्कअभावी विद्यार्थी यूट्यूबच्या माध्यमातूनदेखील शिक्षण घेऊ शकत नाहीत.

मंदिरे सुरू व्हायची असतील तेव्हा ती करावीत. मात्र ग्रामीण भागातील शिक्षणाचा बोजवारा उडाला असल्याने त्याकडे आधी लक्ष द्यावे, असे श्री. खंडागळे यांनी म्हटले आहे…⭕

anews Banner

Leave A Comment