राजेंद्र पाटील राऊत
!दहशतवाद्यांशी आर्थिक सबंध असणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्या!!
आमदार डॉक्टर देवरावजी होळी
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)!!चामोर्शी येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात नवाब मलिक यांच्या निषेधार्थ आंदोलन!!
राजीनामा देत नसतील तर तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी करीत महाविकास आघाडी सरकारचा चामोर्शी व जयनगर व विक्रम्पुर येथे केला निषेध!!
१९९३ च्या बाँबस्फोटात हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम यांस आर्थिक पाठबळ देणे अत्यंत गंभीर!!
भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील अतिरेकी दाउद इब्राहीम याच्याशी आर्थिक व्यवहार झाल्याच्या कारणावरून ईडी द्वारा अटक होऊन तीन दिवस झाले परंतु अजूनपर्यंत त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी व जयनगर विक्रमपुर येथील आंदोलनादरम्यान केली.
यावेळी चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, स्वीकृत नगरसेवक तथा ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री आशिष पिपरे, तालुका तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, भोजराज भगत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतिक राठी नीरज रमानुजवार ,विलास पाटील चरडूके ,मास्टर अनिल प्रिसिंगलवार यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.व जयनगर विक्रमपुर येथे पंचायत समिती सदस्य विष्णु ढाली , भाजपा शक्ती केंद्र प्रमुख , बूथ प्रमुख बूथ सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आरोपी व भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई येथील जमिनीचे आर्थिक व्यवहार करताना बॉम्ब स्फोटातील आरोपी व कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर यांच्याशी जमिन खरेदीचे आर्थिक व्यवहार केले .त्या रकमेचा उपयोग १९९३ मध्ये दाऊद इब्राहिम ने मुंबई येथे बाँबस्फोट घडवून आणण्यासाठी केला . त्यात मुंबईतील असंख्य निरपराध लोकांना ठार केले . असा गंभीर आरोप असणाऱ्या मंत्र्यांला राज्यातील सरकार पाठीशी घालत असून सदर प्रकरण अतिशय गंभीर आहे. असंख्य लोकांचे प्राण घेणार्या आतंकवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या या मंत्र्यास राज्य सरकारने पाठीशी न घालता तात्काळ बडतर्फ करावे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले.