Home विदर्भ जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते महागाव (खुर्द) येथे माता मंदिर...

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते महागाव (खुर्द) येथे माता मंदिर चे उदघाटन..!!

178

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते महागाव (खुर्द) येथे माता मंदिर चे उदघाटन..!!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) अहेरी  तालुक्यातील महागाव (खुर्द) येते माता मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती, गावात माता मंदिर होता. मात्र लाकडा पासून तयार केले होते, प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल, सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्वप्रथम माता मंदिरात जाऊन पूजा अर्चना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पाडत असतात. मात्र माता मंदिर व्यवस्थित नसल्याने महागाव (खुर्द) येथील सर्व समाज बांधवांनी गावात बैठक घेवून जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे माता मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता, जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी शासनाकडून माता मंदिर बांधकामासाठी निधी प्राप्त होत नाही मात्र मी माझ्या स्वखर्चाने माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिले व बांधकाम हि पूर्ण झाले असल्याने आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पूजा अर्चना करून रितसर उदघाटन करण्यात आले..!!

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागावचे सरपंचा सौ. रेणुका आत्राम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या कु. सुनीता कुसनाके, श्रीनिवास आलाम, ग्रा. प. सदस्य मधुकर आत्राम, गणेश चौधरी, श्रीहरी आलाम, उमा मडगुलवार, मानिषा चौधरी, जीजा कूसरम, सौ. चंद्रकला कोडापे पो. पा. ग्रा. प. सदस्य राजू दुर्गे, वंदना दुर्गे, संगीता आत्राम,चंद्राजी रामटेके, प्रमोद रामटेके, दिपक कुसनाके, बबलू,इस्ठाम, शंकुतला आलाम, पेन्टुबाई नैताम, लक्ष्मी आलाम, बारीकराव तलांडे, नागलू आत्राम, सखाराम आलाम, तुकाराम नैताम, प्रभाकर मडगुलवार, बाजीराव आत्राम, संतोष मरपेलीवार, आदि उपस्थित होते..!!

Previous articleदहशतवाद्यांशी आर्थिक सबंध असणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्या!! आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleसमर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; अज्ञानी राज्यपाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.