Home विदर्भ अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार व हत्याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या- अन्यथा महाराष्ट्र...

अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार व हत्याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या- अन्यथा महाराष्ट्र पेटणार..!

224

राजेंद्र पाटील राऊत

अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार व हत्याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या- अन्यथा महाराष्ट्र पेटणार..!
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
संग्रामपूर तालुका शिख शिकलीकर बांधवाचे राष्ट्रपती याच्याकडे मागणी

संग्रामपूर ता.प्र.- तेलंगाणा राज्यातील हैद्राबाद येथील अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपींवर कार्यवाही करून फाशीची शिक्षा द्यावी ,कार्यवाही न झाल्यास तेलंगाणा सरकार व पोलिस विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन पेटल्याशिवाय राहणार असा सज्जड इशारा देऊन महामहिम राष्ट्रपती , पंतप्रधान , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आज दिनांक. 19 फेब्रुवारी रोजी तहसिलदार संग्रामपूर मार्फत संग्रामपूर तालुका शिख शिकलीकर समाज यांच्यावतीने निवेदन दिले आहे. हयावेळी या घटनेचा तहसिल कार्यालयासमोर समाजाच्यावतीने तेलगांणा सरकारचा जाहिर निषेध करून त्या सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यात .

निवेदनात असे नमुद केले की, तेलंगाणा राज्यातील हैद्राबाद रंगारेडडी शुभाषनगर येथील शिख शिकलीकर समाजातील अल्पवयीन मुलगी हिचेवर दिनांक 14फेब्रवारी 2022 रोजी रात्रीच्या सुमारास गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अपहरण करून व लैगिक अत्याचार करून तीची अमानुषपणे सुभाषनगर जवळील एका बांधकाम सुरु असलेल्या चार मजली मकानावर वरून फेकुन हत्या केली. हि अत्यंत दुदैवी व अमानवी घटना आहे. सदर घटनेला आज 5 दिवसाचा कालावधी उलटूनही तेलंगाणा सरकारने व पोलिसांनी कोणतेही कार्यवाही केली नाही. यामधील सर्व आरोपींवर कार्यवाही करून अटक करावी आणि जलद गती न्यायालयात प्रकरण चालवुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व न्याय मिळवून दयावा अशी मागणी केली. अन्यथा समाजाच्या वतीने तेलंगाणा सरकार व पोलिस विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा दिलेल्या निवेदनातुन दिला आहे. हयावेळी शिख शिकलीकर समाजाचे लाखनसिंग चव्हाण, पत्रकार दयालसिंग चव्हाण, बलवंतसिंग बावरी , रुपसिंग चव्हाण, कुलदिपसिंग बावरी, आजादसिंग डांगी, जगदिशसिंग पटवा यांच्यासह तालुकयातील समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleजिंतूर तालुक्यातील कावी येथे पारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी
Next articleमा. विस्तार अधिकारी यांनी माहीती सादर करण्यासाठी ग्राम, दुर्गा दैत्य सचिव यांना दिला सहा दिवसाची वेऴ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.