Home गुन्हेगारी अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का.. रावळगांवची कल्याणी “बेवफा”लैला, प्रियकर गोरखला...

अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का.. रावळगांवची कल्याणी “बेवफा”लैला, प्रियकर गोरखला जाळूनच मारला..!

79
0

राजेंद्र पाटील राऊत

अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का..
रावळगांवची कल्याणी “बेवफा”लैला,
प्रियकर गोरखला जाळूनच मारला..!
(थेट लोहणेरहून राजेंद्र पाटील राऊत)
आज १४ फेब्रुवारी व्हँलेटाईन डे,आणि या व्हँलेटाईन डेच्या अवघ्या दोन दिवस अगोदरच नाशिकच्या लोहणेर गावात एक रक्तरंजीत जळीतकांड घडले.आणि प्रेमविराला जिवाला मुकावे लागले या घटनेने पुरता महाराष्ट्र हादरुन गेला.आजकाल प्रेम म्हणजे काय?याची जाणीवच आजच्या तरुणाना राहिलेली नाही.प्रेम म्हणजे ईश्वराची देणं,प्रेमात एकमेकांच्या सुख दुःखाचा विचार केला जातो.प्रेमात आत्मसर्मपणाची भावना असते.पण…प्रेम हे कधीच कुणाच्या जीवावर उठणार नाही…असा हा प्रेमाचा इतिहास असला,तरी “साथ जियेंगे साथ मरेंगे हम तुम दोनो लैला,म्हणविणारे आजकालचे गरजेपुरते प्रेमाच्या नावाखाली जवळ आलेले अल्लड बुध्दीचे हुल्लड प्रेमवीर खरे तर प्रेमापोटी नव्हेच फक्त शारीरिक आकर्षणापोटी एकत्रित आलेले असतात.अन मग तो अघटीत प्रकार घडतो आणि खरे प्रेमावरील देखील मग विश्वास उडून जातो.अशीच हि घटना..”युवा मराठा” न्युजच्या वाचकांसाठी आज प्रत्यक्ष लोहणेर गावाला भेट देऊन मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी बनविलेला हा सविस्तर वृतांत!
नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यात असणारे लोहणेर हे गाव गिरणा नदीकाठी वसलेले असल्याने या गावात सधन व बागातदार वर्ग मोठया प्रमाणात वास्तव्यास आहे.अशा या गावात कोळी समाजाचा गोरख काशीनाथ बच्छाव हा तरुण आपल्या कुटूंबियासमवेत मोठ्या गुण्यागोविंदाने राहत होता.मात्र अलिकडच्या काळात मालेगांव तालुक्यातील रावळगाव जवळच्या बी सेक्शन येथील कल्याणी सोनवणे हिच्या संपर्कात गोरख आल्याने “आँखोही आँखो मे इशारा हो गया,”प्रमाणे दोघांचे प्रेमप्रकरण फुलले रंगले..दोघेही एकाच समाजाचे असल्यामुळे त्यांना काही अडचणच नव्हती.पण…हे कल्याणीचे असलेले प्रेमप्रकरण तिच्या घरच्यांना मान्य नव्हते.म्हणून त्यांनी कल्याणीचे लग्न दुसरीकडे जमविण्याचा प्रयत्न सुरु केला,तर इकडे प्रियकर गोरखसोबत असलेले सगळे सबंध कल्याणीने संपूष्ठात आणले.मात्र प्रियकर गोरख कल्याणीसोबत घालवलेले क्षण विसरु शकत नव्हता.तो अगदी उदास व वैफल्यग्रस्तसारखा वागत होता.तर कल्याणीचे जमलेले लग्न या ना त्या कारणाने मोडले जात होते.आणि हे कल्याणीचे हे लग्न लोहणेरचा कल्याणीचा प्रियकर गोरख हाच मोडत असल्याचे खुळ कल्याणीचे आई ,वडील,व दोघ भावांनी डोक्यात घालून घेतले आणि “रिकामी खोपडी सैतान का घर”या पध्दतीने कल्याणीचे कुटूंबीय आई,वडील,व दोघे भाऊ स्वतः कल्याणीसोबत रावळगावहून थेट लोहणेर गावी शुक्रवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पोहचून गोरख यास काही बोलायचे आहे असे म्हणून फोन करुन बोलावून घेतले.आणि लोहणेर गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे गोरख येताच त्याचेवर लोखंडी राँडने डोक्यावर जोरदार प्रहार केला,गोरख खाली पडताच कल्याणीच्या भावानी व बापाने त्याच्यावर सोबत आणलेल्या कँनमधील पेट्रोल ओतले.गोरख जीव वाचविणौयासाठी शेजारील ओम साई मोबाईल शाँपी या शिवदे बंधूच्या दुकानात शिरला तर त्या दुकानात घुसून बेवफा लैला कल्याणीने माचीसची काडी पेटवून गोरखला जीवंत मोबाईलच्या दुकानातच पेटवून दिले.सुमारे ५५ टक्के जळालेल्या गोरखवर प्राथमिक उपचार देवळा ग्रामीण रुग्णालयात केल्यावर त्याला अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले होते,तर लोहणेर गावी घटनेच्याच दिवशी जिल्हा पोलिस प्रमुख सचिन पाटील,पोलिस अधिकारी माधुरी कांगणे,कळवणचे उपविभागीय पोलिस अधिकारी गायकवाड देवळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक लांडगे आदी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन गुन्हेगारांना ताबडतोब ताब्यात घेत गजाआड केले.दरम्यान पोलिसांचा तपास सुरु असतानाच आज दिनांक १४ फेब्रुवारी रोजी प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करणाऱ्या तरुण तरुणीच्या या प्रेमदिनालाच गोरख गेल्या तीन दिवसापासून मृत्युशी झुंज देत असतानाच आज त्याची प्राणज्योत मालविली.त्यामुळे संपूर्ण लोहणेर गावावर शोककळा पसरलेली बघावयास मिळाली.पोलिस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन असल्याचे बघावयास मिळाले.तर कल्याणीचे प्रेम हेच अखेर गोरखचा गेम करुन गेले,त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.(वृतसंकलन प्रतिनिधी-भिला आहेर देवळा,बाळासाहेब निकम कळवण, नयन शिवदे सटाणा)

Previous articleवाहन चोराला पकडणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार
Next articleअच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का.. रावळगांवची कल्याणी “बेवफा”लैला, प्रियकर गोरखला जाळूनच मारला..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here