Home पुणे वाहन चोराला पकडणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार

वाहन चोराला पकडणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार

185

राजेंद्र पाटील राऊत

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधीउमेश पाटील
वाहन चोराला पकडणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार
पिं. चिं. मनपाच्या भोसरी नर्सेस क्वॉर्टर गव्हाणे वस्ती भोसरी या ठिकाणी बुधवार दिनांक 09/02/2022 रोजी रात्री 10.30 वाजता वाहन चोराला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. सैनिक इंटेलिजेसीचे सुरक्षारक्षक गणेश बनाटे यांनी चोराला पकडले व पोलीसांच्या हवाली केले. 4 ते 5 जण नर्सेस क्वॉर्टर व शनी मंदिर परिसरात घुटमळत होते नर्सेस क्वॉर्टर मधून शाईन गाडी चोरट्याने चोरल्याचे लक्षात आले त्यावेळी त्याला पकडले असता त्याचे इतर साथीदार पळून गेले परंतु एक जनाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गणेश बनाटे यांच्या याकामाबद्दल त्यांना नर्सेस क्वॉर्टर च्या नागरीकांच्या वतीने बनाटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आशा साबळे उषा सोनवणे छाया लखन वैशाली जगताप भारती कोळी कांचन उबाळे महादेवी जमादार विजया टकले टकले सोमेश्वर बंडवाला तानाजी झेंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रखवालदाराचा सन्मान करण्यात आला

Previous articleजिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे जमादारास मारहाण
Next articleअच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का.. रावळगांवची कल्याणी “बेवफा”लैला, प्रियकर गोरखला जाळूनच मारला..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.