Home विदर्भ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरुद्ध संतापजनक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरुद्ध संतापजनक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करा..! आमदार डॉ देवराव होळी

104
0

राजेंद्र पाटील राऊत

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरुद्ध संतापजनक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करा..!
आमदार डॉ देवराव होळी
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चामोर्शी शहरात आज भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्शी भा.ज.पा. युवा मोर्चा तालुका चामोर्शी यांच्या वतीने गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचे नेतृत्वात स्थानिक लक्ष्मी गेट चौक येथे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह आणि अशोभनीय व्यक्तव्य करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे बद्दल केलेली वक्तव्य वल्गना, संतापजनक आणि बोलघेवड्या प्रवृत्तीचे असुन लोकप्रियतेसाठी हपापलेले नाना पटोले विरुद्ध गुन्हा नोंदवून त्वरित अटक करण्यात यावी आणि नाना पटोले यांनी त्वरित स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी प्रधानमंत्री यांसारख्या घटनात्मक पदाच्या गरीमेचे भान ठेवले नाही आणि असभ्य भाषेचा वापर करून देशाचे माननीय पंतप्रधान यांचा जाहीर अपमान केला. या वक्तव्याचा जाहीर धिक्कार व निषेध करून पोलिसांनी पटोले विरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करावी अशी मागणी आमदार डॉ देवराव होळी व भाजपा पदाधिकारी यांनी केली, तसेच पोलीस स्टेशन चामोर्शी येथे पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब यांचेकडे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष यांच्या विरोधात तक्रार दाखल केले. यावेळी प्रामुख्याने भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील भाऊ वरघंटे ,भा.ज.पा. तालुका अध्यक्ष दिलीप चलाख ,तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे ,युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक राठी , भुवनेश्वर चुधरी, नगर सेवक विजय गेडाम , नगरसेविका सौ, कविता किरमे , युवा नेते नरेश अल्सावार , प्रशांत पालारपवार ,मास्टर रामचंद्र वरवाडे,लोमेश सातपुते, विनोद चलाख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here