Home कोकण गुहागर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यानी...

गुहागर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यानी सर्व कर्मचारी बंधु भगिनीना प्रत्यक्ष भेटून दिला जाहीर पाठींबा

195
0

राजेंद्र पाटील राऊत

गुहागर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा

तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यानी सर्व कर्मचारी बंधु भगिनीना प्रत्यक्ष भेटून दिला जाहीर पाठींबा

युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I ०९ नोव्हेंबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

परिवहन महामंडळाचे म्हणजेच एसटीचे विलीनीकरण महाराष्ट्र शासनामध्ये अधिकृतपणे व्हावे या व इतर मागण्या करता संपूर्ण महाराष्ट्रात गेले दहा दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 100% चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील एसटी सेवा सुरळीतपणे चालु असताना कामबंद आंदोलन करावे की न करावे असे दोन मतप्रवाह चालू होते. अखेरीस गुहागर तालुका एसटी आगारातील सर्व संघटनेच्या 354 कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने परिवहन महामंडळाचे विलीनीकरण महाराष्ट्र शासनामध्ये व्हावे याकरिता अखेरीस 100 टक्के काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला प्रारंभापासूनच भारतीय जनता पार्टीच्यावतीने आमदार मान.गोपीचंद पडळकर,प्रदेशाध्यक्ष सन्मा. आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने भारतीय जनता पार्टीची वरिष्ठ स्तरावरची नेतेमंडळी या संपात उतरले आहेत. गुहागर आगारातील सर्व संघटनांचे एसटी कर्मचारी आगार आवारातील दत्त मंदिरात एकवटलेले असतानाच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह येथे भेट देऊन भारतीय जनता पार्टीचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला.हा संप चालू असताना एसटी सेवेमधील 35 कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत मागील 10 दिवसात आपले प्राण गमावले आहे. मात्र याची कोणतीच खंत या निर्दयी सरकारला नसल्याची टीका यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेशजी सुर्वे यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील लखिमपुर मधील काही घटनांमध्ये आपले ५ शेतकरी बांधव जीव गमावुन बसले याचे समर्थन कधी होऊ शकत नाही मात्र लखिमपुरमधील शेतकऱ्यांच्या मृत्यूकरता महाराष्ट्र बंद करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे महाराष्ट्रातील तीघाडी सरकार महाराष्ट्रातील जेव्हा 35 एसटी कर्मचारी दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर आपला जीव गमावतात आणि याची कोणतीही दखल घेत नाही यासारखे दुर्दैव नाही. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात महाराष्ट्रातील आघाडी सरकारसारखे मदांध राजकर्ते सत्तेत कधीही बघितले नसल्याचे यावेळी निलेश सुर्वे यांनी सांगितले. गुहागर आगारातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या व कुटुंबीयांच्या उज्वल भविष्यासाठी शासनाच्या विरोधात एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी जो लढा उभारलेला आहे या लढ्यामध्ये गुहागर तालुक्यातील संपुर्ण भारतीय जनता पक्ष हा एसटी कर्मचाऱ्यांच्या कायम सोबत राहणार असल्याचे यावेळी तालुकाध्यक्ष निलेशजी सुर्वे यांनी सांगितले. यावेळी तालुका सरचिटणीस सचिन ओक,नगरपंचायत भाजप गटनेते उमेशजी भोसले,गुहागर शहर युवा मोर्चा अध्यक्ष मंदार पालशेतकर, अल्पसंख्याक आघाडीचे ज्येष्ठ नेते इक्बाल भाई पंछी,मुनाफ दळवी, संगम मोरे, अमित जोशी, सुहास निमकर ,आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleउद्या छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि रा.प कर्मचारी गुहागर आगार यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
Next articleखेड मध्येही एसटी वाहतूक कोलमडली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here