Home कोकण उद्या छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि रा.प कर्मचारी गुहागर आगार यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे...

उद्या छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि रा.प कर्मचारी गुहागर आगार यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑

296
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 उद्या छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि रा.प कर्मचारी गुहागर आगार यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
✍️ रत्नागिरी : विजय पवार ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी -⭕ रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी हि संस्था गेली ७ वर्षे रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा,सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक शिबिरे अशा क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने या काळात कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचे पालन करुन व शासकीय रुग्णालयात रक्ताची निर्माण होणारी गरज लक्षात घेवून मानवहिताच्या भावनेतून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक बांधिलकी जपणारी संस्थने गुहागर डेपो,ता.गुहागर, जि. रत्नागिरी येथे रक्तदान शिबीर बुधवार दि १० नोव्हेंबर २०२१ रोजी वेळ सकाळी १०.०० वा ते दुपारी १.०० पर्यंत आयोजित केले आहे.

तरी सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करावे असे आव्हान छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. सुनिल धावडे व रा.प.कर्मचारी गुहागर आगार यांनी केले आहे. ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here