Home माझं गाव माझं गा-हाणं एस टी महामंडळातील सर्व डेपो आणि कर्मचारी एकत्र या….. कॉ जे पी...

एस टी महामंडळातील सर्व डेपो आणि कर्मचारी एकत्र या….. कॉ जे पी गावीत

518
0

राजेंद्र पाटील राऊत

एस टी महामंडळातील सर्व डेपो आणि कर्मचारी एकत्र या…..
कॉ जे पी गावीत
कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                              गेल्या सहा दिवसापासून कळवण आगार येथील एस टी महामंडळातील वाहक चालक हेल्पर व इतर कर्मचारी ऐन दिवाळीत मुल बाळ कुटुंब वाऱ्यावर सोडून आपल्या विविध मागण्या संदर्भात ठिय्या मांडून कळवण येथे आंदोलनास बसले आहेत, या आंदोलनाची दखल घेण्यासाठी आणि कर्मचारी बंधू बहिणींवरील वर्षानुवर्ष होणारे अन्याय्य आणि वेळोवेळी आंदोलने, कामबंद करूनही दुर्लक्षित केलेले कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न यासंदर्भात आज १ नोव्हेंबर रोजी कॉ. जे पी गावीत कॉम. टीनू पगार व ईतर कार्यकर्त्यांनी कळवण (डेपो) येथे एस टी महामंडळ विभागातील आंदोलन कर्त्यांची भेट घेतली.
यावेळी आंदोलन करत्या कर्मचारी प्रतिनिधी यांनी, सर्व आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांसमोर निवेदन दिले,.
शासणाकडे आमचे विलीनीकरण करावे, आर्थिक परिस्थितीने निर्माण झालेल्या आमच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, या व इतर मागण्या तसेच वर्षानुवर्ष झालेल्या अण्याय आणि समस्यांचा पाढाच वाचला,
*यावेळी कळवण सुरगाणा मतदार संघाचे माजी आमदार कॉम जे पी गावीत यांनी आंदोलन कर्त्याना सबंध एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना व संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले*.
तुमचे विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी शासणाबरोबर फार मोठा संघर्ष आणि कठोर आंदोलन करावे लागेल. यासाठी फक्त एका कळवण डेपो ने आंदोलन करून चालणार नाही यासाठी महाराष्ट्रातील सर्व एस टी डेपो आणि एस टी महामंडळ कर्मचारी संघटना गटबाजी ला बळी न पडता एकविचाराणे एकत्र या, एकत्र आल्याशिवाय तुमचा आवाज शासनापर्यंत पोहचणार नाही, आणि तुमच्या प्रश्नांची दखल शासनाकडून घेतली जाणार नाही. शासन कोणतीही गोष्ट सहज देत नाही, हा ईतिहास आहे, त्यासाठी आपण सर्व कर्मचारी एकजुटीने संघर्ष करण्यास तयार रहा. शासनाला जागे करण्यासाठी आणि तुमच्या मागण्या पुर्ण करून घेण्यासाठी, वर्षानुवर्ष होणारे अन्याय दुर करण्यासाठी क्रांतिकारी मार्ग पत्करणे काळाची गरज आहे.
*तुम्ही सर्व कर्मचारी एक व्हा, आमच्यावर विश्वास ठेवा, आवाज द्या, सांगाल तेंव्हा पाठिंबा देऊन मी स्वतः माझी ताकत घेऊन, तुमच्या संघर्षात पुढे होऊन, एस टी महामंडळ कर्मचारी बंधू बहिणींचे प्रश्न सोडविण्यासाठी, न्याय देण्यासाठी पुढाकार घेईल असे आश्र्वासन जे पी गावीत यांनी आंदोलन कर्त्यांसमोर दिले.*
आपण कर्मचारी गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, शाळकरी मुले मुली, युवक युवती, नोकर वर्ग, अधिकारी पदाधिकारी, महिला यांच्या सेवेसाठी रात्र दिवस शहरापासून तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील खेडोपाडी जनसेवा करतात, हे आदर्श कार्य तुमच्या हातून घडत असल्याने आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे तुमचे सर्व प्रश्र्न मार्गी लागलेच पाहिजेत म्हणून येणाऱ्या काळात आपण सर्व तुमच्या आंदोलनाचा आवाज शासन दरबारी पोहचविण्यासाठी एकजुटीचे लढा देऊ, असे आश्वासन देऊन आंदोलकर्त्यांना न्याय हक्कासाठी हिम्मत दिली…
*”लढाई न्याय, हक्काची”””*
“”””””””””””””————-“””””””””””’’’
🇦🇴🇦🇴🤝🇦🇴🇦🇴

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here