राजेंद्र पाटील राऊत
कमलापुर येथिल नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचे पाणी जि.प. अध्यक्ष अजय कंकडावार यांच्या शुभाहस्ते टाकिच्या लोकांपण कार्यक्रम संपन्न: गडचिरोली: (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- जिल्हातील अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय कमलापुर येथे जिल्हा परिषध बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत शुध्द पाण्याचं पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली,सदर टाकिचा बांधकाम काम पुर्ण झाले असुन संपुर्ण गावात ग्राम पंचायत अंतर्गत 15 व्या वित्त निधितुन नळ जोळणी करण्यात आली असल्याने कमलापुर गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळणार आहे. सदर पिण्याच्या पाण्याचा टाकीच्या वर सदर नळ सुरु करुन आज जि.प.अध्यक्ष श्री . अजयभाऊ कंकडावार यांच्या हस्ते लोकांपर्ण करण्यात आले आहे . यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री भाष्कर तंलाडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,पंचायत समिती सदस्य सौ.सुरेखा नैताम,कमलापुर चे संरपंच श्रीनिवास पेंदाम ,उपसंरपच सचिन ओलेटिवार,रेप्पनंपंल्लीचे संरपंच सौ.लक्ष्मी आञाम,उपसंरपंच विलास नेरला,ग्राम पंचायत सदस्य इंदू पेंदाम,प्रणाली मडावी,लक्षमी सडमाके,लक्ष्मण कोडापे , कलावती येजूलवार,व गावातील महिला व नागरिक उपस्थित.