Home नांदेड तब्बल 75 जणांनी लग्न मंडपातच घेतली कोरोना लस. कर्मचाऱ्यांना वाजत गाजत नेले...

तब्बल 75 जणांनी लग्न मंडपातच घेतली कोरोना लस. कर्मचाऱ्यांना वाजत गाजत नेले लग्न मंडपात. अनोख्या उपक्रमाची तालुकाभर चर्चा.

214
0

राजेंद्र पाटील राऊत

तब्बल 75 जणांनी लग्न मंडपातच घेतली कोरोना लस.

कर्मचाऱ्यांना वाजत गाजत नेले लग्न मंडपात.

अनोख्या उपक्रमाची तालुकाभर चर्चा.

नांदेड ब्युरो चीफ मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेस प्रतिबंध घालण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांच्या मिशन ७५ तास लसिकरणासाठी या अभियानांतर्गत मुखेड तालुका प्रशासनाच्या वतिने गाव तिथे लसिकरण मोहीम राबविण्यात येत असुन तालुक्याच्या शेवटच्या टोकाला म्हणजेच ६० कि.मी.अंतरावर असलेल्या आंदेगाव तांडा ( भोजू तांडा ) ता.मुखेड येथिल तांड्यावर दि.२४ आॅक्टोबंर रोजी तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तलाठी एस. के. देशमुख व ग्रमसेवक एल.एन.घुळेकर यांच्या पुढाकाराने एका विवाह मंडपातच कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देेत ७५ जणांनी लस घेतली आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या लसिकरण शिबिराची सर्वत्र चर्चा होत आहे.
मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद पासून जवळच असलेल्या आंदेगाव तांडा येथे रविवारी विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता त्यामुळे या विवाह सोहळ्यात लसिकरण शिबीर घेण्याची संकल्पना चर्चेच्या माध्यमातून आखण्यात आली आणी या संकल्पनेला वधु व वराचे पितांनी परवानगी दिली आणी लसिकरणासाठी आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वाजत गाजत मिरवणुकिप्रमाणे लग्ण मंडपात नेण्यात आले विवाह सोहळ्याच्या ठिकाणी पोहचताच तलाठी एस एम देशमुख व ग्रामसेवक घुळेकर यांनी कोरोना लस चे महत्व समजावून सांगत नागरिकांना लस घेण्याचे आवाहान केले त्यांच्या आवाहानास तेथील लोकांनी उत्सस्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे लगीन घाई मध्येच तलाठी, ग्रामसेवक,शिक्षक व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपली लसीकरण घाई करून घेत ७५ तांडावासींयाना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली यावेळी आरोग्य सेविका संध्या मॅडम, वाघमारे, शिक्षक बेंजलवार एस एन, मुगलेवार जी. डी, यामावर सी.जी., श्री.गोडाजी , जाधव एस. व्ही, अंगणवाडी सेविका, आशावर्कर तसेच सरपंच रुक्मिनबाई जाधव, रामराव जाधव, पोलीस पाटील शंकर राठोड, राशन दुकानदार विजय नगराळे, जीवन पाटील, बाबु पाटील, सुनील जाधव, श्रावण पवार, अनिल राठोड, खुशाल पाटील, सुभाष राठोड, शिवाजी राठोड, रमेश राठोड, नरसिंग राठोड या सर्वांनी विशेष मेहनत घेऊन लग्न मंडपात सुद्धा लसीकरण शिबिर यशस्वी केले.

Previous articleउठा उठा दिवाळी सुरु झाली! उघडा डोळे बघा नीट!!
Next articleजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना नवनाथ जगताप यांनी शपथ देऊन केला दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here