Home मुंबई उठा उठा दिवाळी सुरु झाली! उघडा डोळे बघा नीट!!

उठा उठा दिवाळी सुरु झाली! उघडा डोळे बघा नीट!!

166
0

राजेंद्र पाटील राऊत

उठा उठा दिवाळी सुरु झाली! उघडा डोळे बघा नीट!!

करमुसे प्रकरणात तक्रार नोंदवल्यानंतर दिड वर्षानी त्या जित्याला नाममात्र अटक करुन लगेच पाचव्या मिनिटाला जामिनावर सोडण्यात आल.

पण या कानाचा सुगावा त्या कानाला लागु दिला नव्हता. मिडियानी अस काही घडल्याच आम्हाला माहित नाही अस दाखवल. बातमी किरीट सोमय्यांपर्यंत रात्री पोहचली. त्यांनी खात्री करुन मग बातमी ट्विट केली. तेंव्हा झक्कत मिडियाला नाईलाजाने महत्वाच्या घडामोडींमध्ये ४३ नंबरला ही बातमी टाकावी लागली.

पुण्यात अनेक सभा व कार्यक्रम आयोजित केलेल्या अजित पवारांना अचानक काय झाल माहित नाही. अनन्या पांडेने एन सी बी कार्यालयात आपला जबाब नोंदवला व आधी अनेकदा शिवलेली मामुची पॅन्ट यावेळेस चांगली हातभर फ़ाटली. लगेच काका मला वाचवा म्हणुन फ़ोन गेला. काका वर्षावर जाउन पोहचले. तिकडे अजित पवार सगळे कार्यक्रम रद्द करुन मुंबईला जायला निघाले.

काही तरी घडल होत किंवा घडणार होत, नाही तर दादा कश्याला मामुला भिक घालतात. किती झाल तरी काकांनी गादीत बसविलेला मांडलिक राजा तो. पण जेंव्हा जेंव्हा एखाद पाप अंगलट येत तेंव्हा मग सगळे भेदभाव मानापमान बाजुला ठेवुन सगळे एकत्र येतात. आघाडी अजुन मजबुत होते – अस काकाच म्हणतात हं, मी नाही.

अस काय सांगीतल अनन्याने एन सी बी ला? तिने बॉलिवुड मध्ये ड्रग्ज कोण सप्लाय करत, कोण कोण त्या सप्लायरचे रेग्युलर ग्राहक आहेत हे सगळ कबुल केल होत. तीच्या चॅट मध्ये सापडलेल्या अनेक नावांबद्दल तीने कबुली दिली होती. त्यात करण जोहरच्या पार्टीत असलेल्या अनेक चेहर्‍यांची नाव होती. महाराष्ट्राच्या युवराजांच्या सिने व ॲडव्हरटाईजमेंट क्षेत्रात काम करणार्‍या अनेक मित्र मंडळींबरोबरचे चॅट होते. अनन्याने अवधानाने म्हणा किंवा इम्मॅच्युअर असल्यामुळे म्हणा समीर वानखेडेंना माहितीचा खजिना सोपवला होता.

प्रकरणाची व्याप्ती आता अख्ख बॉलिवुड गिळंकृत करते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

आणी आता कार्डेलिया क्रुझ प्रकरणाचे धागेदोरे थेट मातोश्री पर्यंत जाऊन पोहचले होते.

कार्डेलिया क्रुझवर १५०० लोकांना तीन रात्र एकत्र यायची कोव्हीड काळात निर्बंध लागु असताना महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन मंत्र्याने आपल्या मित्रांच्या आग्रहास्त्व परवानगी दिली होती. आणी हे बिंग आता फ़ुटणार होत. कार्डेलिया क्रुझ कंपनी ही टुरिझम क्षेत्रात काम करते. दिल्लीच्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने आपले मुंबईतले कॉन्टॅक्ट्स वापरुन युवराजांकडुन या क्रुझच्या सहलीसाठी परवानगी मुळवुन दिली.

तीन दिवसाच्या सहलीला जायचा दर होता ₹. १,८०,००० अधीक जिएसटी. आणी क्रुझच बुकिंग फ़ुल झाल होत. सगळ कस कायदेशीर झाल होत, मविआ सरकारची परवानगी घेवुन.

पण घात झाला.

अचानक शाहरुखचा पोरगा त्या पार्टीत गावला. एन सी बीला कल्पना नसताना. बातमी जेंव्हा ऑर्गनायझर पर्यंत व नंतर ड्रग माफ़ियांपर्यंत पोहचली तेंव्हा उच्च पातळीवरुन प्रकरण दाबण्यासाठी ऑफ़र दिल्या गेल्या. पहिले ५ कोटी, पंचनामा झाल्यावर २५ कोटी, आकडा वाढत वाढत १००० कोटीवर जाउन पोहचला. पण समीर वानखेडे या कश्याला बळी पडले नाही.

प्रकरण हाता बाहेर जात गेल. व्याप्ती वाढत गेली. आता तर थेट युवराजांच्या गळ्याशी हे प्रकरण आले आहे. अश्या वेळेस दादा व काका मामुच्या मदतीला धावुन जाण स्वाभाविकच होत. शेवटी आघाडी धर्म म्हणुन काही असत की नाही? इतर कुठल्या धर्माच नाही पण आधाडी धर्माच मात्र काका पालन करतात.

फ़िल्डिंग लावुन काकांनी एक प्रभाकर साईल नावाच पात्र मिडिया समोर आणल. त्याचा व्हिडियो काढताना हा साईल जाम टेंशन मध्ये दिसत होता. त्याच ब्लड प्रेशर वाढलेल दिसत होत. सारखा खोकला येत होता. आता हे बुजगावण काका कोर्टात का नाही उभ करत? मानेशिंदे का नाही मोहम्मद नबाबने उपस्थित केलेला एकही मुद्दा कोर्टासमोर आणत? कारण सगळ फ़र्जी आहे.

उद्या नवीन आठवडा सुरु होत आहे. एन सी बी कडे मोठा बॉम्बगोळा तयार आहे तर मविआ कडे प्रभाकर साईल सारखे फ़ुसके लवंगी फ़टाके.

महाराष्ट्रातील आतषबाजी दिवाळीचा एक आठवडा आधीच साजरी होणार असे दिसते.

मजा आनेवाला है.

देखते रहो.

पण जस ज्ञानदा म्हणते तस उघडा डोळे बघा नीट.

Previous articleवाढत्या महागाईमुळे शिवसेनेचा मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश
Next articleतब्बल 75 जणांनी लग्न मंडपातच घेतली कोरोना लस. कर्मचाऱ्यांना वाजत गाजत नेले लग्न मंडपात. अनोख्या उपक्रमाची तालुकाभर चर्चा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here