• Home
  • शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ

शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211025-WA0032.jpg

शासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ
युवा मराठा l रत्नागिरी I २५ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

रत्नागिरी- २००५ पासून सुरु झालेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाची उपयुक्तता लक्षात घेऊन व मंडळाचे चांगले कार्य पाहून शासकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ शिंगारे यांनी एका वर्गात मंडळाच्या कार्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.महाविद्यालयामध्ये नव्याने रुजू झालेल्या विद्यमान प्राचार्या डॉ रमा भोसले यांनी माजी विद्यार्थी मंडळाला महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्वतंत्र वास्तू कार्यालयासाठी उपलब्ध करुन दिली. कार्यालयाचा शुभारंभ नुकताच प्राचार्या डॉ. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ भोसले यांनी फित कापून कार्यालय प्रवेशद्वाराचे उदघाटन केले.माजी विद्यार्थी मंडळाच्या नामफलकाचे अनावरण मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी केले.कार्यकारिणी सदस्यांच्या नामफलकाचे अनावरण जेष्ठ सदस्य विनायक हातखंबकर यांनी केले.
माजी विद्यार्थी मंडळाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र जागा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नूतन प्राचार्या डॉ. रमा भोसले यांचा सत्कार विजय वाघमारे यांनी केला.कार्यक्रमासाठी असलेल्या माजी प्राचार्या डॉ.ज्योत्स्ना ठाकूर , डॉ रमेश भोसले, डॉ.राजश्री देशपांडे, प्रा चाकोते, प्रा. ढोणे मॅडम, श्री.मादगे, अनंत जाधव ,संदेश रहाटे यांनी मंडळाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, जेष्ठ सदस्य विनायक हातखंबकर,विजय वाघमारे , डॉ रमेश भोसले, डॉ.राजश्री देशपांडे यांनी मनोगते व्यक्त केली.
प्राचार्या डॉ.रमा भोसले यांनी मंडळाच्या कामाचे कौतुक केले तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे आणि या मंडळाने अमृतनिधी किमान ७५०००/- पंच्याहत्तर हजार देणगीतून जमा करावा असे सूचित केले.या कामात माझे व माझ्या सहकाऱ्यांचे चांगले योगदान राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव गणपती एडवी व डॉ. तारासिंह नाईक यांनी आभार मानले.

anews Banner

Leave A Comment