Home माझं गाव माझं गा-हाणं वाखारी ते देवळा रस्त्याची दुरावस्था ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ;तात्काळ रस्ता...

वाखारी ते देवळा रस्त्याची दुरावस्था ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ;तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

313
0

राजेंद्र पाटील राऊत

वाखारी ते देवळा रस्त्याची दुरावस्था ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ;तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी : दादाजी हिरे वाखारी/युवा मराठा न्युज नेटवर्क
वाखारी ते देवळा रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे याकडे मात्र बांधकाम विभाग डोळेझाक करत आहे .
वाखारी रस्त्याची केलेली डाग डुगी पावसाच्या पाण्याने वाहून गेली असून रस्त्यात मोठं मोठे खड्डे झाले असून नागरिकांना प्रवासाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वाडी -वस्त्यांना जोडला जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे .
या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी अनेक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधी मागणी केली ,सहा महिन्यांपूर्वी गुंजाळनगर शहरा पुरता मर्यादित सहाशे मिटर रस्त्यांचे काम केले असून उर्वरीत काम तसेच रखडले आहे.
हा रस्ता तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे.दररोज आठ ते दहा गावातील लहान मोठे वाहने या रस्त्यावरून ये जा करत असतात गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे ,त्यामुळे नागरिकांना खड्यातून रस्ता काढावा लागत आहे. रस्ता दुरुस्ती साठी अनेकदा मागणी करून देखील रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
बांधकाम विभाग तात्पुरता स्वरूपात या रस्त्याला पडलेल्या खड्यात मातीचा मुलाम देऊन वेळोवेळी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र या भागात पाहवयास मिळत आहे.
रोज छोटेमोठे अपघात घडत असून येथील भाजीपाला उत्पादकांना टोमॅटो ,कांदा ,मिरची ,कोबी शेतीमालाला स्थानिक बाजारपेठेत घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना माल घेऊन जाण्यासाठी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे.
लवकरात लवकर रस्त्यांचे काम करावे अशी मागणी नागरिकांनकडून केली जात असून अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे

Previous articleसटाणा तालुक्यात लखीमपूर घटनेचा राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन …!
Next articleहे तर ढोंगी सरकार…या सरकारचे नाव “बंद” सरकार ! विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बरसले..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here