Home चंद्रपूर महाकाली नगरी चंद्रपुर मध्ये पांचव्या वर्धापन दिन थाटात संपन्न ..

महाकाली नगरी चंद्रपुर मध्ये पांचव्या वर्धापन दिन थाटात संपन्न ..

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240310_201114.jpg

*प्रेस न

🔸महाकाली नगरी चंद्रपुर मध्ये
पांचव्या वर्धापन दिन थाटात संपन्न ..

🔸शानदार सोहळ्यात मान्यवरांचा सत्कार…

चंद्रपुर,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)- : माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना. तथा इंडिया 24 न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 3 मार्च 2024 रोजी रविवारला स्व. जतीरामजी बर्वे सभागृह इंदिरानगर मुल रोड चंद्रपूर येथे “महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार तथा सन्मान सोहळा” आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांची अध्यक्ष म्हणून प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुंबईच्या ज्येष्ठ समाजसेविका मा. सौ. जयश्रीमाई सावर्डेकर, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास दादा पठारे, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम हनुमानजी जांभुळकर, संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. शिल्पाताई बनपुरकर , संघटनेचे युवा अध्यक्ष रशीद खान पठाणजी, सिने अभिनेत्री रिया वाघ सिने,अभिनेता नाथाभाऊ , डिजिटल मिडिया असोशियन चे अध्यक्ष जितेंद्र चोरडियाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या नंतर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या संपूर्ण अतिथिंचे स्वागत करण्यात आले. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीरामजी जांभुळकर यांनी संघटनेची प्रस्तावना मांडली. पाच वर्षांमध्ये संघटनेतर्फे करन्यात आलेल्या कार्यांची सविस्तर संकल्पना मांडली. चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन संघटनेच्या कार्यशैलीचे भरभरुन कौतुक केले, संघटनेच्या उत्तरोत्तर प्रगति साठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संघटनेने गोरगरिबांचा आवाज सतत उठवण्याचे कार्य करावे, असा संदेश दीला.
संघटनेच्या माध्यमातून पत्रकार, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीड़ा क्षेत्रतिल अनेक नामवंत व विचारवंत व्यक्तींचा सत्कार करून समाजात त्यांचे अनमोल योगदान असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करन्यात आले.

संघटनेचे कार्य,ध्येय, उद्देश्य योग्य दिशेने जात आहे,असे मत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी स्पष्ट केले.
संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जांभुळकरजी यांचे पाच वर्षापासून सुरू असलेले कार्य सामाजिक बांधीलकीचे आहे. अशा शब्दात बोलून भरभराटीने शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पत्रकार, राजकीय, सामाजिक, क्रीड़ा क्षेत्रतिल सन्माननीय व्यक्तींचा सत्कार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रात चंद्रपुर चे अभ्यासु पत्रकार जितेंद्र चोरडियाजी, भद्रावती चे पत्रकार जावेदजी शेख व राजु गैनवारजी, चंद्रपूरच्या पत्रकार खुशाल हांडेजी, सामाजिक कार्यकर्ते डी के आरीकरजी, भूतपूर्व नगरसेवक वंदनाताई जांभुळकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक आक्केवार जी, मनसेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवारजी, चामोर्शी तालुक्यातील घोटचे लोक मंगल संस्थेचे महिला अध्यक्षा एडवोकेट शाईनी मॅडम, लोकमंगल संस्था के उपाध्यक्ष मिर्मला मॅडम, सामाजिक कार्यकर्ता अशोक पोर्डीवार यांचा सत्कार करन्यात आला.

संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील काही नामवंत सामाजिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात कृषी क्षेत्रातील शेतकरी अशा नामवंत विचारवंत व्यक्तींना संघटनेच्या वतीने “महाराष्ट्र रत्न पुरस्कार व गौरव सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुल नगरी मधील अनंतराव रामटेके सामाजिक कार्यकर्ते यांना डॉ. विश्वरत्न भारतरत्न डाॅ.आंबेडकर राज्यस्तरीय सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले. चंद्रपूर नगरी मधील हाॅकी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. दिलीप मिश्रा यांना मेजर ध्यानचंद राज्यस्तरीय सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. चिमूर भिसी कृषी क्षेत्रात कार्य करणारे खेमचंद समर्थ यांना कृषी महाराष्ट्र रत्न सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. चिमूर भिसी नगरी मधील अरविंद रेवतकर यांना बिरसा मुंडा योद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. चिमूर नगरी मधील राजकीय क्षेत्रात युवा नेतृत्व करणारे रवींद्र लोहकरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गुजरातच्या समाजसेविका मंदाकिनी मेहता यांना सांस्कृतिक क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भद्रावती येथे सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे किसनजी माटे यांना समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. भद्रावती येथिल सामाजिक कार्यकर्ते वासुदेवभाऊ ठाकरे यांना छत्रपति शिवाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. अशा विविध क्षेत्रात कार्य करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील संघटनेच्या वतीने त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीड़ा अशा अनेक क्षेत्रात लोकप्रिय नेतृत्व करणारे यांना महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने संघटनेच्या वतीने संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीरामजी जांभुळकर यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्याला यशस्वी करण्याकरिता संघटनेचे पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटणारे संघटनेचे ज्येष्ठ महाराष्ट्र राज्य सल्लागार नागेंद्रजी चटपल्लीवार,चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष अनंतराव रामटेके , महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा सौ. कीर्ती पांडे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुनील रामटेके, मुल तालुका कार्यकारी अध्यक्ष डॉ. आनंदराव कुळे, मुल तालुका शहराध्यक्ष प्रवीण भरटकर, मुल तालुका, सिंदेवाही तालुका अध्यक्ष तेजेन्द्रजी नागदेवते, उपाध्यक्ष सिंदेवाही तालुका डॉ. रेवानंद बांबोडे, इंडिया 24 न्यूज चैनल तालुका प्रतिनिधी तथा सिंदेवाही तालुका कार्याध्यक्ष धनराज सरपातेजी, खांडेकरजी व समस्त पदाधिकारी : करण कोलगुरीजी, चामोर्शी तालुका महिला अध्यक्षा रूपा शहा, चामोर्शी तालुका महिला उपाध्यक्ष श्रुती सरकार, चामोर्शी तालुका महिला संघटक अशा शहा, इंडिया 24 न्यूज चॅनलचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजू शंभरकरजी, जितेंद्र गुलानी जिल्हा महासचिव, भद्रावती शहर अध्यक्ष बबलू उर्फ सरफराज खान पठाण, वरोरा तालुका अध्यक्ष वरोरा तालुका अध्यक्ष संजय कोटकर, वरोरा तालुका उपाध्यक्ष डॉ. इस्माईल पठाण, वरोरा तालुका सचिव महादेवराव कोटकर, वरोरा तालुका संपर्कप्रमुख मतीन शेख, वरोरा तालुका सरचिटणीस वसंता भोईर, वरोरा तालुका ग्रामीण संपर्कप्रमुख अंकुश मडावी, या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जी गेडाम संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचेआभार व आभार प्रदर्शन किशोरजी मुठे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी केले. राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here