Home माझं गाव माझं गा-हाणं अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची मदत मिळणार?

अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची मदत मिळणार?

119
0

राजेंद्र पाटील राऊत

अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची मदत मिळणार?
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मराठवाड्यासह काही ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. गुलाब चक्रीवादळाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जबरदस्त बसला आहे. दरम्यान, राज्यातील या परिस्थितीची मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या विभागाकडून आढावा घेतला.
मराठवाड्यातील 22 लाख हेक्टर शेती उद्धवस्त झाल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ओला दुष्काळ जाहीर करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील शेतीची स्थिती पाहता विरोधक सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची तातडीची मदत द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. पंचनामे होत राहतील. आधी शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना मदत द्या, अशी आक्रमक मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री मराठवाडा दौरा करणार
राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी 7 हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले. राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Previous articleपुण्यातील राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत                                                         
Next articleसटाणा तालुक्यातील धांद्री या गावी अतिवृष्टीने घातले थैमान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here