Home कोकण छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व राजा शिवछत्रपती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्त...

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व राजा शिवछत्रपती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्त साधून केली जयगड किल्ला परिसराची स्वच्छता

86
0

राजेंद्र पाटील राऊत

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व राजा शिवछत्रपती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्त साधून केली जयगड किल्ला परिसराची स्वच्छता                                               रत्नागिरी ,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शिवजयंतीचे औचित्त साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष सुनिल धावडे यांच्या नेतृत्वाखाली छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व राजा शिवछत्रपती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोजी पंचक्रोशीतील २६ तरुण दुर्गसेवक एकत्र येऊन किल्ले जयगड परिसराची साफसफाई करण्यात आली.
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व राजा शिवछत्रपती परिवार यांच्या २६ शिलेदारांनी किल्ले जयगड स्वच्छता करण्याचे ठरवले. छावा प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या शिलेदारांकडून जिल्ह्यातील विविध किल्ले संरक्षण, तसेच किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवणे असे उपक्रम वेळोवेळी छावा प्रतिष्ठान माध्यमातून राबविण्यात येतात तसेच छावा प्रतिष्ठान च्या माध्यमातून दवाखाने, शाळा, बसस्थानके, विविध धार्मिक स्थळे, व समाजोपयोगी उपक्रम असणा-या ठिकाणी स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात येतात,तसेच तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विविध मार्गदर्शन शिबिरे देखील वेळोवेळी आयोजित केले जातात.वृद्ध, अपंग, व्यक्तींसाठी मतिमंद मनोरुग्ण यांना शासनाच्या विविध योजना सवलती मिळवून देण्याचा संघटनेकडून प्रयत्न करण्यात येतात. निसर्गामुळे येणारी आपत्ती पावसामुळे होणारे नुकसान तसेच निसर्ग मुळे येणारी आपत्ती किंवा पावसामुळे होणारे अपघात स्थळी जे बचाव कधी लागेल ती छावा प्रतिष्ठानमार्फत करण्यात येतात.
या स्वच्छता मोहिमेत दुर्गसेवकांनी किल्याची खंदके, वाढलेली झाडे झुडपे, गवत काढणे असे काम केले. हि मोहिम यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व राजा शिवछत्रपती परिवार चे सर्व पदाधिकारी व सदस्य सचिव समीर गोताड, खजिनदार गणेश कांबळे, प्रवक्ता संगम धावडे, सचिन धावडे, विजय धावडे, निलेश कळंबटे, सुदिप पवार, अमन आग्रे, मयुर रोडे, प्रविण रोडे, प्रकाश गोताड, मुकेश धावडे, दिनेश कुर्टे, सुमित वाडकर, दिपाली वाडकर, शौर्य वाडकर, सुमित पावसकर, उमेश पालांडे, निलेश पावरी, अपुर्व शिर्के, रहाटे काका, फैयाज दिवेकर, विवेक गुरव, अलंकार मयेकर, राज खाडे यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here