राजेंद्र पाटील राऊत
अतिवृष्टीमुळे पीक पाण्यात गेले; चिंताग्रस्त तरुण शेतकऱ्याने लावला गळफास
ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज
ः तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, ३० सप्टेंबर रोजी दुपारी बाराला बेराळा (ता. चिखली) समोर आली आहे.
अमोल प्रकाश सूरडकर (२५, रा. बेराळा, ता. चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. अमोलकडे बेराळा शिवारात ४ एकर शेती आहे. त्याच्यावर इंडियन ओव्हरसीज बँकेचे ८० हजार रुपयांचे कर्ज होते. मात्र यंदा अतिवृष्टी झाल्याने पीक पाण्यात गेले. त्यामुळे तो चिंतेत होता, असे कौटूंबिक सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तपास चिखली पोलीस करीत आहेत.