राजेंद्र पाटील राऊत
पेठवडगाव( राहुल शिंदे): तक्रारदार यांच्यावर पोलिस ठाण्यात मटका, जुगार दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि एफआयआर प्रत देण्यासाठी पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम पंटर तर्फे स्वीकारताना मंगळवार वडगाव पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलसह दोन पंटर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पथकाच्या जाळ्यात अडकले. पोलीस कॉन्स्टेबल अशोक कृष्णा जाधव( वय 31 वडगाव पोलिस ठाणे), पंटर चेतन गावडे(रा, कोरेगाव ता. वाळवा) आणि प्रीतम ताटे ( वय 21, रा पेठ वडगाव ता. हातकणंगले) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव पोलिस ठाण्यात तुझ्यावर तक्रार दाखल असून त्यामध्ये मदत करतो. तसेच तक्रारीची एफआयआर प्रत देतो असे सांगून वडगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अशोक जाधव याने तक्रारदार कडे पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने पोलिस ठाण्याजवळ सापळा लावला. दरम्यान पोलिस कॉन्स्टेबल जाधव यांनी लाचेची रक्कम पंटर चेतन गावडे याला स्वीकारण्यास सांगितले. गावडे याने सहकारी प्रीतम ताटे याला ही रक्कम स्वीकारण्यास सांगितले. त्याप्रमाणे पाच हजारांची लाच स्वीकारताना त्याला ताब्यात घेण्यात आले.