Home विदर्भ अकोला जिल्ह्यात वाहन चालकांकडे कोटयावधी रुपयांचा दंड थकबाकी

अकोला जिल्ह्यात वाहन चालकांकडे कोटयावधी रुपयांचा दंड थकबाकी

118
0

राजेंद्र पाटील राऊत

अकोला :(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)- वाहन चालविताना नियमांचा उलंघन करणाऱ्या वाहनधारकांना विरुद्ध हा दंड आकारला जातो असतो . अधिकवेळा वाहन चालक वाहतूक पोलिसांना नजर अंदाज करून निघून जातात. अशा वाहन चालकांन विरुद्ध आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही पुढच्या वेळी दंड झाला कि भरणे आवश्यक असते. अशा प्रकारची कारवाही झालेल्या शहरातील एक लाख १२ हजार चालकांकडे तीन कोटी रुपये दंड थकबाकी आहे.

ऑटो रिक्षा,मोटारसायकल, चालकांवर मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन केले प्रकरणी दंड थकबाकी आहे. वाहतूक शाखेचा दंडथकबाकी असलेलया वाचन चालकांनी कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये जावून वाहतूक शाखेत भरणा करावा. या शिवाय अकोला शहरातील शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कधीही जावून थकबाकी रक्कम दंड भरू शकता. दंड भरण्याची व्यवस्था २४ तास सुरू राहते.

दंड भरल्यानंतर त्याची पावती ही त्वरित दिली जाते. दंड भरला नाही तर २५ सप्टेंबर रोजी जिह्वा न्यायालय अकोला येथे लोक अदालत आहे त्या मध्ये दंड भरू शकता. थकबाकी असलेले दंड व मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन केलेले खूप वेळ झालेले प्रकरणे हे लोक अदालतमध्ये तडजोडीकरिता ठेवण्यात आलेली आहे. अकोला जिल्हा न्यायालय येथे सकाळी १० वाजता हजर रहावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे .

Previous articleविद्युत तार तुटून पडल्याने ४ बकऱ्यांचा जागीच मृत्‍यू; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना –
Next articleपेठ वडगावात गणेश मंडळाकडून कोरोना योध्दा आरोग्यसेवकांचा सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here