Home विदर्भ विद्युत तार तुटून पडल्याने ४ बकऱ्यांचा जागीच मृत्‍यू; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना –

विद्युत तार तुटून पडल्याने ४ बकऱ्यांचा जागीच मृत्‍यू; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना –

102
0

राजेंद्र पाटील राऊत

विद्युत तार तुटून पडल्याने ४ बकऱ्यांचा जागीच मृत्‍यू; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना –

ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज
ः विद्युत वाहिनीच्या मेन लाइनचे इन्‍सुलेटर फुटून तार तुटली. ही तार अंगावर पडून चार बकऱ्यांचा मृत्‍यू झाला. ही घटना पातुर्डा (ता. संग्रामपूर) शिवारात आज, १९ सप्‍टेंबरला दुपारी १२ च्‍या सुमारास घडली.

मेंढपाळ ओंकार पुंडे हे स्वतःच्या व गावातील पशुपालकांच्या बकऱ्या, जनावरे चराईसाठी पातुर्डा खुर्द शिवारात गेले. बकऱ्या, मेंढरे पडीत शेतात चरत असताना अचानक विद्युत वाहिनीचे मेन लाईनचे इन्सुलेटर फुटून तार तुटून बकऱ्यांच्या अंगावर पडली. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. घटनेची माहिती पातुर्डा विद्युत वितरण कार्यालयाला कळवताच वायरमन राजू सोळंके, अमरसिंग पवार यांनी तात्काळ विद्युत पुरवठा खंडीत केल्याने व विद्युत कर्मचारी महेश गोयल, सुरेश वानखडे यांच्या सहकार्याने वायरमन पवार, सोळंके यांनी मेन लाईनचा इन्सुलेटर बसवून तुटलेल्या तारेची जोडणी करुन पुर्वरत विद्युत पुरवठा सुरू केला.

ओंकार पुंडे, फिरोज खान, राजू इंगळे, रमेश पुंडे यांच्‍या या ४ बकऱ्या आहेत. त्‍यांना महावितरण कंपनीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी या पशु पालकांनी केली आहे.

सहाय्यक अभियंता व्ही. बी. बोर्डे म्हणाले, नियमानुसार आर्थिक मदत देऊ!
घटनास्थळ पंचनामा, उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त होताच विद्युत वितरण विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येईल, असे सहाय्यक अभियंता विजय बोर्डे यांनी सांगितले.

Previous articleपंजाबराव डख हवामान तज्ञ यांनी दहेगाव शिवारातील शेतकर्यांना केले मार्गदर्शन                   
Next articleअकोला जिल्ह्यात वाहन चालकांकडे कोटयावधी रुपयांचा दंड थकबाकी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here