Home विदर्भ अखेर मालेगाव येथील स्मशानभूमीच्या शेडची दुरुस्ती झाली

अखेर मालेगाव येथील स्मशानभूमीच्या शेडची दुरुस्ती झाली

343
0

राजेंद्र पाटील राऊत

अखेर मालेगाव येथील स्मशानभूमीच्या शेडची दुरुस्ती झाली

 

मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे /युवा मराठा न्युज
मालेगांव : – शहरातील आठवाडी बाजार रोडला येथील स्मशानभूमी तिल शेडची गेली अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली होती ढासळलेल्या अवस्थेतील शेड अजून किती वर्षे मरण यातना सोसणार , असा प्रश्न मालेगांव शहरवाशीयांना पडला होता . त्याची ताबडतोब दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी ऋषिकेश सारस्कार यांनी नगर पंचायत कडे केली होती आणि लोकमत ने सुद्धा याबाबत वृत्त प्रकाशित केले होते अखेर आज ते काम पूर्ण झाले असून युवा मराठा च्या पाठपुराव्याला यश आले आहे.
दिवसे दीवस शहराची लोकसंख्या वाढत आहे वास्तविक शरहात 2 स्मशान भूमी ची गरज आहे सध्या च्या समशान भुमी मध्ये अंत्यसंस्कार ओटे अध्याप ही वाढवीन्यात आलेले नाहीत या स्मशानभूमी मध्ये ३शेड असून १ सीमेन्ट क्रॉग्रेड ने बाधंलेले आहे तर २ शेड अँगंल ने बनवीलेले आहेत या दोन्ही टीन च्या शेडला मोठे भगदाड पडले होते पावसाळा असल्या मुळे सर्व पावसाचे पाणी अंत्यसंस्कार ओटयावर पडतो त्यामुळे अंत्यसंस्कार विधीला आलेल्या शहरवासीयांना प्रेत भर पावसाच्या पाण्यातच मृतदेह जाळावे लागत आहे सध्याच्या परीस्थीतीमध्ये अंत्यसंस्कार वोट्या वरील टीनाची परीस्थीती बघता शेड ढासळण्याची भीती वाटत होती. स्मशानभूमीच्या दुर्दशेमुळे पावसाळ्यात व रात्रीअपरात्री अंत्यविधीच्या वेळी मालेगाव करानचे हाल होत आहेत सावडायला आल्यानंतर महिलांना , वृद्धांना , काही काळ का होईना पण त्रास सहन करावा लागतहोता . गावची लोकसंख्या 35000 ते 40000 असून गावात अनेक राजकीय मात्तबर आहेत . गावाने एकत्र येऊन नगरपंचायत सर्व राजकिय पक्षीय एकत्री केली आहे . असे असताना गेली पाच- सहा वर्षे स्मशानभूमी शेडची दुर्दशा का झाली , अशी चर्चा शहरवासी मध्ये होतहोती . लवकरात लवकर नगरपंचायतीने ढासळलेल्या स्मशानभूमी शेडची दुरुस्ती करावी , अशी मागणी ऋषिकेश सारस्कार यांनी केली होती अखेर या मागणी ची दखल घेत आज ते टिन दुरुस्ती चे काम पूर्ण झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे .

Previous articleसुदृढ मेळघाट अभियानाचा दुसरा टप्पा कार्यान्वित सर्वेक्षण व तपासण्या काटेकोरपणे कराव्यात – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर       
Next articleकंचनपुरला सुंदर गांव पाहणी समितीची भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here