Home Breaking News नांदेड येथे बेरोजगार दिव्यांगांनी केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी देत राजपत्रित अधिसुचना पत्राचे...

नांदेड येथे बेरोजगार दिव्यांगांनी केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी देत राजपत्रित अधिसुचना पत्राचे दहन करून जिल्हाधिकारी मार्फत केले पंतप्रधानांना निवेदन सादर

130
0

नांदेड येथे बेरोजगार दिव्यांगांनी केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी देत राजपत्रित अधिसुचना पत्राचे दहन करून जिल्हाधिकारी मार्फत केले पंतप्रधानांना निवेदन सादर

नांदेड प्रतिनिधी / राजेशNभांगे

नांदेड – सरकारी नौकर्यांमध्ये दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या चार टक्के आरक्षणाचा कोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आणि या संदर्भातील राजपत्रीत अधिसूचना हि नुकतीच जारी केली असुन यानुसार आता दिव्यांगांना आयपीएस, पोलिस दल, रेल्वे संरक्षण दल यासारख्या सरकारी सेवांमधील नियुक्त्यामध्ये चार टक्के मिळणारे आरक्षण रद्द करण्यात आले आहे आणि हा जाचक जुलमी निर्णय महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील दिव्यांगांवर घोर अन्याय करणारा आहे आणि भविष्यात या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सर्व घटक राज्ये हि असेच निर्णय घेऊन दिव्यांगांना हक्काच्या चार टक्के आरक्षणापासुन दुर ठेऊ शकतात आणि भविष्यात दिव्यांगांना शासकीय नौकरी असो वा निमशासकीय नौकरी असो ती मिळणारच नाही त्यामुळे असा प्रकार भविष्यात घडु नये यासाठीच आज दि. २३ आॅगस्ट २०२१ रोजी कमल फाउंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड आणि संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी नांदेड यांच्याकडुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुल साळवे यांच्या नेतृत्वात राजपत्रित अधिसुचना पत्राचे दहन करण्यात आले आहे.
व तसेच या ठिकाणी संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पाटिल गुबरे आणि नागनाथ कामजळगे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परीसर दनानुन सोडला त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले.

तर या निवेदनात म्हटले आहे कि सदरील हा जुलमी जाचक निर्णय मागे घेत तत्काळ रद्द करावा अन्यथा लवकरच पंतप्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे कुठलीच पुर्व सुचना न देता तिवृ स्वरूपाचे आंदोलन करू आणि जर तीथे हि न्याय न मिळाल्यास नांदेड जिल्ह्यात एकाही केंद्रीय मंत्र्यांला तसेच केंद्रिय पदाधिकारी आणि पथकाला फिरकु देणार नाही तथा सभा, बैठका होऊ देणार नाही असा कठोर इशारा आंदोलन कर्त्या सर्व बेरोजगार दिव्यांगांनी घेतला आहे.

तर यावेळी करण्यात आलेल्या या आक्रमक आंदोलनात राहुल साळवेसह सुनिल जाधव,प्रदिप पाटील गुबरे, नागनाथ कामजळगे, शामसुंदर गायकवाड, लक्ष्मीकांत जाधव, परमेश्वर आकाडे.संजय सोनुले.विठ्ठल सुर्यवंशी.राजु ईराबत्तीन.ज्ञानेश्वर बेळे.वैभव पईतवार,किरणकुमार न्यालापल्ली.सिद्धोधन गजभारे.शेख आरिफ.संदिप घुगे,शेख मौलाना यासिबसाब.गजानन हंबर्डे.मंगेश जाधव.सयद माजीद अली.शेख गौस.शंकर गिमेकर.दिलीप कांबळे.संजय बोईनवाड.माधव बेरजे.गणेश वर्षेवार.निलेश गोनेवार.रमेश लंकाढाई.प्रकाश नागोरे.अब्दुल हबीब अब्दुल हतीफ.अब्दुलवाह अब्दुल खादर.ईस्माईल चौधरी.प्रकाश निलावार.सय्यद हाकिम सय्यद करीम.शेख जाकेर शेख रसुल.कमलबाई आकाडे,रिजवाणा बेगम यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.

Previous articleसंग्रामपुर तालुका भाजपाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ संग्रामपूर बसस्थानकावर केले आंदोलन.
Next articleस्व भाऊसाहेब फूंडकर यांच्या जयंतीचे औचित्त साधून प्रदेश उपाध्यक्ष, मा. तथा आमदार श्री डाँ संजयजी कूटे साहेबांच्या संकल्पनेतून, जळगाव जा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन त्यापैकी एक शेगाव यूवा मोर्चा शहर कार्यकारणी घोषित कार्य़क्म उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here