Home Breaking News पावसाअभावी पिके करपू लागली.

पावसाअभावी पिके करपू लागली.

174
0

पावसाअभावी पिके करपू लागली.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने फुलोऱ्यात चट्यातअसलेली मूग उडीद सोयाबीन तीव्र तापमानाने व पावसाअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे यावर्षी कधी पावसाच्या सुरुवातीलाच पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जवळचे खुडूक मुडूक व उसनवारी पैसे काढून बी बियाणे खत घेऊन शेतकऱ्यांनी वेळेवर पेरण्या केल्या त्यानंतरही पिकांना हवा तसा पाऊस झाला त्यामुळे शेतातील मूग उडीद सोयाबीन ज्वारी तूर कापूस खरीपाची पिके बहरली होती यावर्षी कधी नव्हे एवढी जोमदार पिके शेतात डोलत असल्याने शेतकऱ्यांनी महागडी औषध फवारून कीड नियंत्रणात आणली होती पिकाकडे बघून त्यावर मोठा खर्च केला मात्र गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस झाला नाही उलट उन्हाच्या तीव्रतेमुळे जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत वातावरणातही उष्णता असल्यामुळे फुलोऱ्यात आलेली पिके माना टाकत आहेत उन धरत असल्यामुळे शेतकर्‍यांनी बी-बियाणे खते फवारण्यासाठी कर्ज काढून केलेला खर्च वाया जाणार या भीतीने शेतकर्‍यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील एक-दोन दिवसात पाऊस झाला तरीही नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे मुगाचे पीक हाताचे गेले आहे त्यामुळे बी-बियाणे खते फवारणी साठी काढलेले कर्ज कसे फेडायचे व संसाराचा गाडा कसा चालवायचा याच चिंतेत शेतकरी असल्याचे दिसून येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here